🌟असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिला🌟
मुंबई : महाराष्ट्र राज्यात मानवी आरोग्यास हानिकारक असलेल्या बनावट पनीरसह खव्याची देखील मोठ्या प्रमाणात निर्मितीसह विक्री होत असून बनावट पनीर आरोग्यासाठी धोक्याचे आहे असे बनावट पनीर विक्री करीत असलेल्या विक्रेत्यांसह बनावट पनीर निर्मिती करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल अनॉलॉग चीजच्या नावाखाली बनावट पनीर विक्रीबाबत संबंधित अधिकारी,लोकप्रतिनिधी या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींची बैठक घेण्यात येईल या बैठकीत निर्णय घेऊन बनावट पनीर विक्रीबाबत कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिला.
ॲनालॉग चीज हा पदार्थ राज्यात ॲनालॉग पनीर,आर्टिफिशियल पनीर किंवा फेक पनीर या नावाने विक्री केल्या जात असल्याबाबत सदस्य विक्रम पाचपुते यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य कैलास पाटील यांनीही सहभाग घेतला.उपमुख्यमंत्री पवार या सूचनेच्या उत्तरात माहिती देताना म्हणाले का, खाद्यपदार्थांतील भेसळ ओळखण्यासाठी त्यांचे नमुने घेण्यात येतात. या नमुन्यांची तपासणी करून त्याचे विश्लेषण करण्यात येते. प्रयोगशाळांमधील विश्लेषणामुळे भेसळ आढळलेल्या नमुन्यांवर कारवाई करीत भेसळयुक्त पदार्थ जनतेमध्ये जाण्यापासून रोखता येतात. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळा, नवीन प्रयोगशाळांचे बळकटीकरण यासाठी भरीव निधी देण्यात येईल.
पवार म्हणाले की, बनावट पनीरची विक्री, साठवणूक व वाहतुक विरोधात कारवाई करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करून ते कठोर करण्यात येतील......
0 टिप्पण्या