🌟महाराष्ट्र राज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता....!

 


🌟यावेळी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहू शकतात विदर्भातील अनेक जिह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसू शकतो🌟

मुंबई :- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहणार आहे राज्यात उष्णतेची लाट असताना देखील पुढील ४८ तासांत वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

यावेळी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहू शकतात विदर्भातील अनेक जिह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसू शकतो अनेक जिह्यांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. अमरावती, वाशीम, नागपूर आणि गडचिरोली या जिह्यांना 'यलो अलर्ट' म्हणजेच वादळवाऱ्यासह मुसळधार तर वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिह्यांना 'ऑरेंज अलर्ट' म्हणजे अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून नागपूरसह विदर्भातील अनेक जिह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या