🌟राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला इशारा🌟
पुणे : महाराष्ट्र पोलीस दलातील कोणताही पोलिस अधिकारी अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात सापडल्यास त्याचे केवळ निलंबन होणार नाही तर त्याला थेट बडतर्फ केले जाईल असा इशारा राच्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
महाराष्ट्र पोलीस परिषद शनिवारी झाली. त्यात विविध विषयांवर चर्चा झाली. त्याची माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, परिषदेत देशात नवीन तयार झालेल्या तिन्ही कायद्यांचे अंमलबजावणीचे सादरीकरण झाले. सायबर व्यासपीठ सादरीकरण झाले. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आरोपपत्र जलद गतीने न्यायालयासमोर वेळेत कसे जाईल त्यावर चर्चा झाली. अंमली पदार्थ संदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात कोणतीही हयगय सहन करणार नाही. या प्रकरणात कोणताही पोलीस कर्मचारी किंवा कोणत्याही रँकमधील अधिकारी सापडला तरी त्याचे थेट निलंबन करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.....
0 टिप्पण्या