(जागतिक महिला दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला)
🌟उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कारासह शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न🌟
पुर्णा (दि.०८ मार्च २०२५) शासनाने दिलेल्या विविध लस सर्व विद्यार्थ्यांनी घेतल्या पाहिजे कारण आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आई वडील नेहमी काळजी घेतात त्यांना आनंद वाटेल असे काम केले तर मनुष्य जन्माचे सार्थक होईल असे प्रतिपादन आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी भोसले यांनी केले.
गौर येथील श्री सोमेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात 'जागतिक महिला दिन' व शाळेतील इ ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून मेदुज्वरावर मात करण्यासाठी जे ई ची लस देण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश गोरे, प्रमुख मार्गदर्शक डॉ.अश्विनी भोसले, डॉ विठ्ठल पतंगे, रुपाली बनसोडे, दिपाली बनसोडे,भीमराव ढगे, वैजनाथ पारवे, पंकज मिठेवाड, मंगेश पारवे ,सज्जन रेनगडे, शुभम रनबावरे आदीची प्रमुख उपस्थिती होती.
जागतिक महिला दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यात डॉ. अश्विनी भोसले, प्रगती यन्नावार , रंजना शिवणकर, कामाक्षी साकोळकर, वयोवृध्द यमुनाबाई सरकाळे, शोभाबाई सरकाळे आदी महिलांचा सत्कार करण्यात आला. काही मुलींनी मनोगतात आई रात्रनदिवस काळजी दुसऱ्याची करते स्वतः ची कमी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संध्या कदम यांनी केले तर सूत्रसंचालन नवनाथ बोबडे यांनी केले. आभार दिपाली बनसोडे यांनी मानले......
0 टिप्पण्या