🌟राज्यातील महायुती सरकार विधानसभा निवडणुकीत निवडणुकीतील सर्व आश्वासने पूर्ण करणार.....!

 


🌟राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन🌟 

पुणे : कर्ज माफी देता येणे सध्या शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी बँकांमध्ये पैसे भरावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सांगितले असतानाच दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, सरकार निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करेल असे शनिवारी स्पष्ट केले.

शिंदे यांनी सांगितले की, राज्याच्या आर्थिक स्थितीला समतोल ठेवणे आवश्यक असून, कल्याणकारी योजना, विकास आणि कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधी उपलब्ध राहायला हवा. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना मिळणाऱ्या मासिक मदतीत वाढ करून ती १,५०० वरून २,१०० करण्यात येईल. राज्याच्या सध्याच्या आर्थिक मर्यादा लक्षात घेऊन पवार यांनी शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्जाचा हप्ता भरावा आणि कर्ज माफीची वाट पाहू नये, असे सांगितले होते.

💫राज्यातील शेतकऱ्यांना पुढची तीन वर्षे कर्जमाफी नाहीच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत घेतलेली भूमिका योग्य आहे. अजितदादांची जी भूमिका आहे, तीच सरकारची भूमिका आहे. अजित पवारांनी कर्जमाफी कधीही शक्य नाही, असे वक्तव्य केले नाही. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली होईपर्यंत पुढची तीन वर्षे तरी शेतकरी कर्जमाफी होणारच नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पंढरपुरात स्पष्ट केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या