🌟भारतीय राज्यघटनेचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच - राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार


🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने आयोजित लोकतंत्र बचाव परिषदेत बोलताना ते म्हणाले🌟 


पुर्णा :-
पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने दि.२४ मार्च वार सोमवार रोजी सायंकाळी ७ वाजता लोकतंत्र बचाव परिषदेचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात करण्यात आले होते. या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांची उपस्थिती होती. परिषदेचे उद्घाटक म्हणून पालम नगरीचे माजी नगराध्यक्ष जालिंदर हत्तीअंबिरे, लोकतंत्र बचाव परिषदेचे अध्यक्ष म्हणून ताडकळस नगरीचे उपसरपंच प्र. संजय जल्लारे तर प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विनोद भाऊ भोळे, दैनिक क्रांतीशस्त्र संपादक धम्मपाल हनवते, मा. ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मगरे, सामाजिक कार्यकर्ते लिंबाजी कनकटे, गुट्टे काका मित्र मंडळाचे ताडकळस शहराध्यक्ष प्रकाश फुलवरे, ताडकळस मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देवानंद नावकिकर, पत्रकार सुरेश मगरे, युवा नेते नामदेव कनकटे, अशोक वाघमारे, युवा नेते गजानन खंदारे, अनंता खंदारे, युवा नेते संतोष कांबळे तसेच ऑल इंडिया पॅंथर सेनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष माधव भालेराव, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे परभणी जिल्हा सचिव संजय हनवते, पूर्णा तालुकाध्यक्ष निलेश वाघमारे, पालम तालुकाध्यक्ष अनिल मस्के, गंगाखेड तालुका अध्यक्ष विकास रोडे, डॉ. कुणाल बनसोडे यांच्यासह आदी उपस्थित होते. या परिषदेला मुख्य मार्गदर्शक ऑल इंडीया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी मार्गदर्शन केले. पुढे बोलताना म्हणाले की, हे सरकार गोरगरीबांच्या हिताचं नसुन जाती जातीत भांडणे लाऊन आपली मतांची पोळी भाजून घेण्याचे काम करीत आहे, असा सदरील परिषदेत बोलतांना व्यक्त केला. तसेच भारतीय राज्यघटना ही सर्वांच्या हिताची असुन सदरील सरकार हे घटना बदलू इच्छित आहे, म्हणून आपण सर्वांनी मिळून भारतीय राज्य घटनेचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. 


हे सरकार जाती-धर्मात तेढ निर्माण करून मते मिळवण्याचे ह्या सरकारचे धोरण आहे. ओबीसी व मागासवर्गीय महामंडळाचा निधी तसेच विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा निधी लाडकी बहीण या योजनेला वळविण्याचे काम सरकार करत आहे. म्हणून तुम्हाला आमाला गाफील न राहता कामा नये. तसेच परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीना पाठबळ कुणाचे, महिलांवर अन्याय- अत्याचार होतात आहेत व माय, बहीणी सुरक्षित नाहीत. म्हणून सबंध महाराष्ट्रामध्ये लोकतंत्र बचाव परिषदेच्या माध्यमातून आपण राज सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा केदार यांनी दिला. सदरील या परिषदेला पुर्णा तालुक्यातील ताडकळस व परीसरातील बलसा ,सिरकळस, पुलकळस, बलसा, खडाळा, खांबेगाव या गावांसह आदी गावातील लोक लोकतंत्र बचाव परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक राहुल भुजबळ  यांचा गित गायनाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तर या परिषदेचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन जिल्हाध्यक्ष निवृत्ती वाघमारे यांनी केले. ही परिषद यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमांचे मुख्य संयोजक ऑल इंडिया पॅथर सेनेचे जिल्हाध्यक्ष निवृती वाघमारे व कल्याण दुधाटे यांनी केले होते. तर सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यास सचिन मगरे, संघपाल खंदारे, सुधाकर गायकवाड, बालाजी, भालेराव, यांच्यासह ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी आदीनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या