🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या........!


🌟औरंगजेबाच्या कबरीला दुर्दैवाने संरक्षण द्यावं लागत मात्र औरंग्याचं महिमामंडन होऊ देणार नाही ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

✍️ मोहन चौकेकर

1. औरंगजेबाच्या कबरीला दुर्दैवाने संरक्षण द्यावं लागत, मात्र औरंग्याचं महिमामंडन होऊ देणार नाही ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य; भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं लोकार्पण   ; औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी; भाजपचे बडे नेते सुनील देवधर यांची राज्य सरकारकडे मागणी ; औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण करणाऱ्यांनी आधी सोलापूरकर आणि कोरटकरबद्दल बोलावे; अमोल मिटकरींचा महायुतीला घरचा आहेर 

2. तुमच्याकडे 15-20 टाळकी अन् मुख्यमंत्री करू म्हणतात; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा काँग्रेस नेते नाना पटोलेंना टोला ; जे कोणी बँका नीट चालवत नाहीत त्यांना सोडणार नाही, त्यांची नावे काढावीत; विधानसभेत अर्थसंकल्पावर उत्तर देताना अजित पवारांचा इशारा 

3. अजितदादांच्या राष्ट्रवादीचं विधानपरिषदेसाठी ठरलं! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार  सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके यांना संधी; आता एकाच घरात दोन आमदार ; परंतु एक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या , दुसरे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ; विधानपरिषदेवर एकनाथ शिंदेंचाही शिलेदार ठरला! शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांची वर्णी ; विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे हिरमुसल्या, म्हणाल्या, 'जो चाह थी मेरी, वो मुझे नहीं मिली' 

4. बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्येचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर गृहमंत्र्यांचे उत्तर  

5. बरं झालं पक्ष फुटला, स्वत:च्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत मी काम करु शकले नसते; खासदार सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल ; संतोष देशमुखांना मारहाण होताना फोनवरुन गंमत बघत होते, केंद्राला तीन पत्रं पाठवली; सुप्रिया सुळेंची  धनंजय मुंडेंवर टीका 

6. 'माझे दोन्ही पुत्र कर्तृत्ववान हे माझं भाग्य'; खासदार नारायण राणेंकडून भर सभेत दोन्ही मुलांचे तोंडभरून कौतुक  ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सरकार औरंगजेबासारखं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची टीका, खासदार नारायण राणे प्रत्युत्तर देताना म्हणाले, हर्षवर्धन सपकाळ हा मूर्ख माणूस, काँग्रेस बुडवण्यासाठी त्यांची नेमणूक ; देवेंद्र फडणवीस हा देवमाणूस, हर्षवर्धन सपकाळांनी त्यांच्याबद्दल बोलताना स्वत:ची लायकी ओळखून बोलावं; राम कदमांचा हल्लाबोल 

7. राज्याचे विपणन मंत्री जयकुमार रावल यांनी  2 कोटी 65 लाख रुपये हडप केले, संजय राऊतांनंतर माजी आमदार अनिल गोटे यांचा गंभीर आरोप 

8. शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीनावर उद्या फैसला होणार ; लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार! ; युवराज सिंग अन् कॅरेबियन खेळाडूची भर मैदानात बाचाबाची, एकमेकांच्या अंगावर गेले धावून ; भावाने जग सोडलं, बापाने टेम्पो चालवला, टीम इंडियात स्थान मिळाल्यानंतर गायब, आता IPL मधून धडाकेबाज कमबॅक करणार!

9. बीडमध्ये अंगावर काटा आणणारी घटना, प्रेमसंबंधाच्या संशयावरुन मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाला जीव जाईपर्यंत मारलं, अंगावर काळे-निळे वळ ; धुलिवंदनाला जबरदस्ती रंग लावला, जाब विचारायला गेलेल्या तरुणावर कोयता हल्ला करत पोटात दगड घातला, पुण्यात खळबळ ; लाडकी बहीण योजनेचे पैसे दारुवर उडवले; जाब विचारणाऱ्या बायकोवरच कोयत्याने हल्ला, सोलापूरच्या माढ्यातील घटना 

10. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी महाराज एका झटक्यात बदललं, आता शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलायला कोण विरोध करतो बघतोच; भाजपचे तेलंगणातील आमदार टी राजा यांचे कोल्हापुरात आव्हान

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या