🌟तातडीचे काम असेल तरच पडताळणी करून सोडा : राहुल नार्वेकर
मुंबई : मुंबईत विधान भवनात मागील सोमवार दि.०३ मार्च २०२५ पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून या अधिवेशन काळात अभ्यागतांची होणारी गर्दी लक्षात घेता यापुढे विधी मंडळ परिसरात अभ्यागतांना प्रवेश बंदी असणार आहे परंतु एखाद्या अभ्यागताचे तातडीचे काम असल्यास त्याची पडताळणी करूनच पीठासीन अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन सोडा अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संबंधित यंत्रणेला दिले. विधी मंडळ परिसरात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मर्यादित प्रवेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
मुंबईतील विधान भवनात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशन काळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार पक्षाचे नेते मंडळी आदींची ये-जा सुरू असते. त्यातच आपल्या मतदारसंघातील कामानिमित्त राज्यभरातून नागरिक अधिवेशन काळात विधान भवनात येतात. मात्र सोमवार ३ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून अभ्यागताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या गर्दीमुळे पोलीस, अधिकारी आदींवर ताण येत आहे.....
0 टिप्पण्या