🌟महाराष्ट्र राज्य पदवीधर कर्मचारी संघटनेच्या मागणीला यश🌟
परभणी (दि.२८ मार्च २०२५) : परभणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या आदेशान्वये जिल्हा परिषदेंतर्गत १३ परिचरांना कनिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती देण्यात आली आहे.
पदोन्नती देण्यात आलेल्या परिचरांमध्ये ए.व्ही.सुडके,शरयू भांडेकर,डी.आर.कटारे,ए.आर.अडसुळे,एस.एस.साबळे,ए.आर. भोकरे,ए.पी.राठोड,जी.आर.शहाणे,हेमा मारकळ,आशा राठोड, केदार बारगजे,भगवान कंठाळे,संगीता फुलमोगरे या कर्मचार्यांचा समावेश आहे या निवडीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन अधिकारी कन्नावार, रवी झळके यांनी प्रयत्न केले.
या निवडीचे महाराष्ट्र राज्य पदवीधर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामदास बोडके, सुरेश आळसे, दत्ता भुजबळ, बालाजी दामूके यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त करीत पदोन्नती मिळालेल्या कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे.....
0 टिप्पण्या