🌟राज्यात वाळू माफिया आणि वाळू तस्करीच्या घटनांमध्ये वाढ : वाळू तस्करीला बसणार आळा ?


🌟शासन राबवणार सर्वंकष वाळू धोरण : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली माहिती🌟

मुंबई :- राज्यात प्रचंड प्रमाणात होणाऱ्या अवैध वाळू उत्खननासह वाळू तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या राज्यात महसूल आणि पोलीस दलाकडून संयुक्त कारवाई करण्याचे अधिकार आहेत परंतु तरी देखील राज्यात वाळू माफियांनी अक्षरशः हैदोस घातला असून राज्यात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करीच्या घटना वाढतच आहेत यासाठीच राज्य शासन सर्वंकष वाळू धोरण तयार करणार आहे अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदे मध्ये दिली.

विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी सदस्य प्रविण दरेकर, शशिकांत शिंदे, एकनाथ खडसे यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. राज्यात वाळू माफियांना आणि वाळू तस्करांना संरक्षण मिळणार नाही अशी ग्वाही देऊन मंत्री बावनकुळे म्हणाले की, गोदावरी खोऱ्यातील वाळू उपसाबाबत ७ दिवसात चौकशीकरून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. राज्य शासन नव्या वाळू धोरणाबाबत काम करत असून यानुसार आता एम सॅन्ड म्हणजेच दगडापासून तयार केलेल्या वाळूच्या वापरावर भर देण्यात येणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या