🌟सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीचे यंदाचे १२ वे वर्ष🌟
परभणी : परभणी शहरात श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने रविवार दि.०६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीचे यंदाचे हे १२ वे वर्ष आहे. समस्त परभणीकरांच्या वतीने दरवर्षी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवार २७ मार्च २०२५ रोजी स्टेशन रस्त्यावरील लक्ष्मी नारायण मंदिराच्या सभागृहात पूर्व तयारी व नियोजनाच्या दृष्टीने सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीच्या सर्व सदस्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव अतिशय उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचे ठरवण्यात आले. प्रभू श्री रामाच्या जन्मोत्सवानिमित्त निघणार्या या शोभा यात्रेमध्ये प्रभू श्रीराम लल्लाटी सुबक मनमोहक मूर्ती व भारतभरामधील विविध राज्यातून कलापथकांचे व विविध सांस्कृतिक देखावे परभणीकर श्रीराम भक्तांना पाहण्यास मिळणार आहेत. तसेच शोभा यात्रेमध्ये ढोल ताशा पथक, शिवकालीन मर्दानी खेळांचे पथक, लेझीम, मल्लखांब पथकांचा देखील समावेश असणार आहे. यंदाचा श्रीराम जन्मोत्सव अतिशय थाटामाटात आणि उत्साहात साजरा होणार आहे.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीचे सर्व सदस्यांनी पूर्वतयारी सुरु केली आहे. कार्यकर्ते कामाला लागले आहेत, अशी माहिती सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सवाचे संयोजक सदस्यांनी दिली.......
0 टिप्पण्या