🌟यावेळी पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी सकारात्मक भूमिका घेऊन तात्काळ पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन🌟
पुर्णा :- पुर्णा शहरातील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंद नगर,आदर्श कॉलनी,अमृत नगर,तात्यासाहेब नगर, पवार कॉलेज परिसर,बोर्डीकर प्लॉटिंग आदी परिसरामध्ये पुर्णा नगर परिषद प्रशासनाने अद्यापपर्यंत कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित न केल्यामुळे या परिसरांतील नागरिक कायमस्वरूपी पिण्याच्या स्वच्छ व निर्जंतुक पाण्यासाठी तळमळत असतांना पुर्णा नगर परिषदेच्या निर्दयी प्रशासनाला या परिसरांतील नागरिकांवर दया येत नसल्याचे दयनीय दृष्य पाहावयास मिळत आहे.
पुर्णा शहरातील आनंद नगर,आदर्श कॉलनी,अमृत नगर,तात्यासाहेब नगर,पवार कॉलेज,बोर्डीकर प्लॉटिंग आदी भागांतील पाण्याचा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी या परिसरात नवीन जलकुंभ उभारून पाईपलाईन द्वारे तात्काळ पाणीपुरवठा करा या मागणी विषयी भारतीय जनता पक्षाचे परभणी जिल्हा सरचिटणीस लक्ष्मीकांत उर्फ बाळू कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य,कुटुंब कल्याण,पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांची भेट घेऊन शहरातील पिण्याच्या पाणी प्रश्न मांडला यावेळी पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी सकारात्मक भूमिका घेऊन तात्काळ प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले यावेळी लक्ष्मीकांत ( बाळू) कदम गोविंद (राज) ठाकर यांनी पालकमंत्री नामदार मेघनाताई बोर्डीकर यांना या संदर्भात निवेदन देखील दिले.....
0 टिप्पण्या