🌟येत्या काही दिवसांत आम्ही सर्व देशांवर 'टेरिफ' लावणार आहोत अनेक देशांनी आमची अशी लूट केली - ट्रम्प
वॉशिंग्टन : संपूर्ण जगावर 'टेरिफ' लावणार, काय होते बघतो ?, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. येत्या २ एप्रिल रोजी ट्रम्प हे 'टेरिफ'ची घोषणा करणार आहेत. त्यांच्या घोषणेमुळे देशादेशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 'एअर फोर्स वन' या विमानात पत्रकारांशी चर्चा करताना त्यांनी ही घोषणा केली.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, येत्या काही दिवसांत आम्ही सर्व देशांवर 'टेरिफ' लावणार आहोत. अनेक देशांनी आमची अशी लूट केली आहे की, इतिहासात अशी कोणीच केली नसेल. आम्ही त्यांच्याशी चांगले व्यवहार करायला जात होतो. मात्र ही रक्कम देशासाठी अधिक मोठी रक्कम आहे. जे देश अनेक दशकांपासून अमेरिकेसोबत आहेत, त्या देशांसोबत आम्ही 'टेरिफ'च्या बाबतीत अधिक उदार असू, असे ते म्हणाले.....
0 टिप्पण्या