🌟शिवप्रेमींच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढून घटनेतील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी🌟
परभणी : परभणी तालुक्यातील पेडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सोमवार दि.०३ मार्च २०२५ रोजी रात्री ०८.०० वाजेच्या सुमारास वाढदिवस साजरा करणार्या काही उडाणटप्पू मुलांनी केकची फेकाफेक करीत पुतळा परिसराची विटंबना केल्याच्या निषेधार्थ पेडगावातील संतप्त ग्रामस्थांनी काल मंगळवार दि.०४ मार्च २०२५ रोजी पेडगावात कडकडीत बंद पाळला.या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपीं विरोधात गुन्हे दाखल केले आहेत परंतु अद्यापपर्यंत कोणालाही अटक केली नाही त्यामुळे या प्रकरणात संबंधितांविरोधात कठोर भूमिका घ्यावी अशीही मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली.
दरम्यान शिवप्रेमींच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीस दुधाने अभिषेक करण्यात आला. यावेळी सुभाषराव जावळे, नितीन देशमुख, रामेश्वर शिंदे, विठ्ठलराव तळेकर, रामदास आवचार, मंगेश भरकड, सुर्यकांत मोगल, आकाश नवघरे, सुरेश लोहट, भास्करराव झांबरे, ऋषिकेश देशमुख, सुहास देशमुख, अॅड. प्रिती घुले, अॅड. ज्ञानेश्वर घुले, गजानन चट्टे यांच्यासह अन्य सहभागी होते.......
0 टिप्पण्या