🌟भारताने दर्शविली तयारी आयात शुल्क कमी करण्याची – डोनाल्ड ट्रम्प


🌟भारताला रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी बंद करण्याचा अजब सल्ला ?🌟

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल शनिवार दि.०८ मार्च २०२५ रोजी पुन्हा एकदा आयात शुल्काचा मुद्दा उपस्थित करीत भारताला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला अमेरिकेतून निर्यात वस्तूंवर भारताने शुल्क कमी करण्यास सहमती दर्शविली असल्याच दावा देखील अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करतानाच आता अमेरिका रशियावर शुल्क लागू करेल अशी घोषणा त्यांनी केली तर सर्वाधिक शुल्क आकारणाऱ्या देशांवरही त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.

💫अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कांगावा :-

भारतामध्ये तुम्ही काहीही विकू शकत नाही, इतके आयात शुल्क तो देश आमच्याकडून वसूल करतो, मात्र कोणीतरी ही बाब चव्हाट्यावर आणल्याने त्यांनी आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, असा कांगावा ट्रम्प यांनी केला. भारताने अमेरिकेशी व्यापार संबंध अधिक दृढ करण्यासाठी आयात शुल्क कमी करण्याची तयारी दर्शविल्यानंतर काही तासांत ट्रम्प यांनी हे विधान केले आहे.

💫भारत-अमेरिकेत द्विपक्षीय करार :-

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचा दौरा केला. तेव्हाच त्यांनी दोन्ही देशांना लाभ होईल असा द्विपक्षीय व्यापार करार करत त्यावर वाटाघाटी करण्याची तयारी दर्शविली होती. वाणिज्यमंत्री पीयूष गोयल हे अमेरिकेत होते. अमेरिकेतील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी विविध क्षेत्रातील द्विपक्षीय व्यापार करारावर सहमती दर्शविली आहे.

सध्या केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांच्या नेतृत्वाखालील एक पथक अमेरिका दौऱ्यावर आहे. तेथे द्विपक्षीय कराराची रूपरेषा आखली जात आहे. यादरम्यानच ट्रम्प यांनी भारत आकारत असलेल्या शुल्काबाबत टिप्पणी केली आहे. आतापर्यंत सरकारकडून सध्या सुरू असलेल्या द्विपक्षीय वाटाघाटींबद्दल गुप्तता पाळण्यात आली आहे.

💫भारताला रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी बंद करण्याचा सल्ला ?

अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक यांनी, शेती उत्पादनांचा समावेश असलेल्या मोठ्या कराराचा उल्लेख केल्यानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. तसेच त्यांनी भारताला रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी बंद करण्याचा सल्ला दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या