🌟प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी अमोल जाधव यांना युवक काँग्रेसच्या परभणी जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदान केले🌟
परभणी : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अमोल जाधव यांची प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी युवक काँग्रेसच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांनी नवीन नियुक्त्यांची यादी नुकतीच जाहीर केली. त्यात जाधव यांची परभणी जिल्हाध्यक्ष म्हणून घोषणा केली. अमोल नारायण जाधव हे गेल्या 12 वर्षांपासून युवक काँग्रेसच्या माध्यमातून कार्यरत आहेत.
तसेच युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव, म्हणून त्यांनी प्रभावी काम केले आहे. संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर आता युवक काँग्रेसच्या परभणी जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. अमोल जाधव हे माजी मंत्री माजी आमदार सुरेशराव वरपुडकर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.
या निवडीवर प्रतिक्रिया व्यक्त करत अमोल जाधव म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसारच आजवर कार्य केले आहे. वरपुडकर, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील व माजी आमदार सुरेशदादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आपण परभणी जिल्ह्यात युवक काँग्रेसचे काम जोमाने करणार आहोत. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला प्राधान्य देवून युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा गावखेड्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करु, अशी ग्वाही दिली.
दरम्यान, या निवडी बद्दल शहराध्यक्ष नदी इनामदार माजी उपमहापौर भगवान वाघमारे, प्रवक्ते सुहास पंडित, श्रीधर देशमुख, बाळासाहेब रेंगे, बाळासाहेब देशमुख, दिगंबर खरवडे, शेख खाजा, मिन्हाज कादारी, विनोद कदम, मोईन मौली, पवन निकम, नागसेन भेरजे, राजेश रेंगे, श्रीराम जाधव, प्रदीप सोनटक्के, शिवाजी भालेराव, दिलावर शेख यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकार्यांनी जाधव यांचे स्वागत केले.....
0 टिप्पण्या