🌟भिक्खूचे जीवन काय असते ? हे भिक्खू जीवन जगल्या शिवाय कळणार नाही...!


🌟स्वतःधम्मातील मार्गांना प्राप्त करणारा भिक्खू व्हावा.असाच प्रत्येक भिक्खुचा संकल्प असतो🌟

भिक्खूचे जीवन काय असते ? हे भिक्खू जीवन जगल्याशिवाय कळणार नाही.५० वर्षापूर्वी अगदी बालवयात चिवर धारण करून,प्रवर्जित मार्गावर चालण्याचा संकल्प करण,साधी बाब मुळीच नाही.कारण आज सुद्धा भिक्खू जीवन जगण्यासाठी आवश्यक वातावरण आम्हास पाहिजे तेवढ वाटत नाही.थोडंसं आपण जर ५० वर्षा माघे गेलो,तर कशी परिस्थिती असेल ? असा थोडासा जरी विचार केला,तर खूप भीती वाटते.भंतेजी प्रसंग सांगतात,चटणी भाकर खाऊन फिरत होतोत,एकच चिवर तेच धुवायच नंतर तेच वापरायचं.पायी,बैलगाडी,सायकलवर प्रचारासाठी जायचं. कधी कधी अपमानाचे चटके देखील मिळायचे.ह्यासारखी अनेक प्रसंग आहेत ह्या मधून जाणं साधी आणि सोप्पी गोष्ट नाही.नक्कीच आपला संयम,त्याग,सहनशिलता कोणत्याही शब्दामधे कुणीही व्यक्त करण्याजोग्या नाही.कारण स्वतःसाठी कोणीही जगत,परंतु भिक्खू म्हणून फक्त समाजासाठी जगणं साधी गोष्ट नाही.

प्रत्येक वेळी बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचाराची माणसं तयार व्हावीत.व स्वतःधम्मातील मार्गांना प्राप्त करणारा भिक्खू व्हावा.असाच प्रत्येक भिक्खुचा संकल्प असतो.त्या दिशा आणि धोरणाला धरून त्याचे फलित म्हणजे कोरिया,येथे डॉ.भदंत उपगुप्त महाथेरो यांच्यामुळे सगळ्यात पहिला बाबासाहेबांचा पुतळा तिथे बसला व तो पूर्णेतून पाठवला.गोड तिखट वाणीतून मंत्रमुक्त करून लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारे.पूर्णा ह्या शहराचे नाव व भिक्खू हे रूप जगातील अनेक देशामधे ते दार्शनिक,चिकीत्सक संशोधन करून आपले विचार ते आज जगाच्या पाठीवर गाजवत आहेत.आपण जर आमच्या आयुष्यात नसायलात तर,अजून सुद्धा प्रत्यक्ष बाबासाहेब,नीतिमता,सुविचार,विद्वत्ता,योग्य वर्तन म्हणजे काय?कळालेच नसते,आपला जन्म म्हणजे आमच्यासाठी सोन्याचे दिवस.कोणी कितीही वाईट वागला,तरी आपण प्रेमाचा,मैत्रीचा वापर करून समोरच्याला जिंकत असतात.अश्या महान गुरूंच्या अनुकंपेमधे,छत्रछाये खाली जगत आहे.हेच माझ्या कुशल कर्माचा पाक समजतो.हेच माझ भाग्य समजतो.तसेच माझ्यातील दोष,उणिवा आपल्या सानिध्यात राहून दूर होवोत.आपल्या मार्गदर्शनाखाली राहून धम्ममार्गात पुढे जावो.असाच शुभ आशीर्वाद

असो हिच आपणास श्रद्धापूर्वक याचना.....तसेच आपणास शुभेच्छा देण्यास पात्र नाही.परंतु आपला आजचा दिवस हा आम्हास मंगलमय,स्फूर्तीदायक असल्याकारणाने आपणास नम्रतापूर्वक खूप खूप शुभेच्छा.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या