🌟तहसिलदार माधवराव बोथिकर यांनी रंगवले आडगाव (लासिना)/गौर शिवारात कारवाई नाट्य ? पंचनामे देखील नियमबाह्य🌟
🌟शासकीय नौकरशाहाच घालताय शासनाच्या नियमांसह कोट्यवधी रुपयांच्या महसूलावर घाला🌟
या संदर्भात सविस्तर वृत्तांत असा की पुर्णा तहसिलचे तहसिलदार माधवराव बोथीकर यांनी तक्रारीअंती नाईलाजास्तव रेल्वे उड्डाणपूल कंपन्यांच्या आडगाव लासिना शिवारातील पुर्णा-पांगरा ढोणे रोडवरील मिक्सर प्लॉन्टवर धाड नाट्य रंगवून जवळपास बाराशे ते पंधराशे ब्रास अवैध चोरट्या वाळू साठ्याऐवजी केवळ ४५० ब्रास अवैध चोरटा वाळूसाठा दाखवून संबंधित रेल्वे उड्डाणपूल बांधकाम गुत्तेदार कंपन्यांच्या बचावाचे धोरण अवलंबवत थातुरमातुर ०३ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा दंड आकारल्याचा गंभीर प्रकार करून संबंधित कंपन्यांच्या भ्रष्ट कारभाराला उदंड करण्याचे व लाखों रुपयांच्या शासकीय महसुलाला सोईस्करपणे कात्री लावण्याचे काम केले होते त्यामुळे तहसिलदार बोथीकर व महसुल प्रशासनाचा अनागोंदी व भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला होता तहसिलदार माधवराव बोथिकर व महसूल प्रशासनातील अधिकारी शासनाच्या लाखो रुपयांच्या महसूलाची परस्पर विल्हेवाट लावून अवैध वाळू तस्कर माफियांसह शासकीय विकासकामांच्या भ्रष्ट गुत्तेदारांशी हितसंबंध जोपासत असल्याचे उघड झाल्यानंतर या गंभीर प्रकारा विरोधात दि.३० आक्टोंबर २०२४ रोजी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे रितसर रेखी स्वरुपात तक्रार दाखल यानंतर तरी महसूल प्रशासनाच्या कारभारात सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतांनाच तालुक्यातील गौर शिवारातील महादलिंग स्वामी मठ संस्थान (करबसय्या विरभद्रअय्या) या धार्मिक देवस्थानाच्या गट क्रमांक ४०२ मधील वहितीत असलेल्या व सन २०२२/२३ सोयाबीनचे पेरे,सन २०२३/२४ खरीप पेरणीला सोयाबीन तर रब्बी हंगामात ज्वारी पिकांचे पेरे लावलेल्या ३८ एकर जमिनीवर हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील लासीन मठ स्थंस्थान अध्यक्ष भोगवटदार म्हणून करबसैय्या विरभद्रअय्या यांच्या देखरेख व अधिपत्याखाली एकूण ३६ ते ३८ एकर जमिनीपैकी १० एकर जमिनीवर समृध्दी महामार्ग रस्ता बांधकामांचे टेंडर घेतलेल्या मोंटेकार्लो लिमिटेड कंट्रक्शनचे पुर्णाचे मुख्य प्रोजेक्ट मॅनेजर व वसमत येथील लासीन मठ संस्थानच्या अध्यक्षांनी गौर येथील ग्रामस्थ लिंगायत समाज बांधवांना पूर्वकल्पना न देता परस्पर देवस्थान जमिनीवर समृध्दी महामार्ग रस्त्यासाठी स्टोन क्रेशर व अन्य गौण खनिजची वाहने ठेवण्यासाठी भाडे रक्कम ठरवत करारनामा पत्र केले. नंतर स्टोन क्रेशर बसविण्यात आले तसेच तहसील व जिल्हास्तरावरील महसूल गौण खनिज विभागाची परवानगी मिळाली नसतानाही कंत्राटदाराने जमिनीत मोठ्या प्रचंड प्रमाणातरित्या मुरुम/माती/दगड खडीचे पोकलेन मशीनच्या साहाय्याने अनाधिकृत उत्खनन करण्यास सुरूवात केली धार्मिक देवस्थानाच्या विहिरीतील जमिनीत बेकायदेशीर उत्खनन केले जात असतांना तहसिलदार बोथीकर व महसूल प्रशासनाचे अधिकारी थारकर झोपेचं सोंग घेऊन बसले होते की काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून या संदर्भात प्रसार माध्यमांनी वृत्तांकन करताच खडबडून जागे झालेल्या तहसिलदार माधवराव बोथिकर व महसूल प्रशासनाचे अधिकारी प्रशांत थारकर यांनी आडगाव लासिना शिवारातील पुर्णा-पांगरा ढोणे रोडवरील उड्डाणपूल गुत्तेदार कंपनी गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मिक्सर प्लॉन्ट वरील जप्तीनाट्या प्रमाणेच पुन्हा एकदा गौर शिवारातील गट क्रमांक ४०२ मध्ये जप्तीनाट रंगवून ३५ ते चाळीस हजार ब्रास मुरुम/दगड उत्खनन केल्याचा मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी गौर यांच्याकडून थातूरमातूर पंचनामा करून पुन्हा एकदा संबंधित गुत्तेदार कंपनीशी हितसंबंध जोपासल्याचे दिसून आले वास्तविक पाहता नियमानुसार आडगाव लासिना येथील पुर्णा-पांगरा ढोणे रोडवरील मिक्सर प्लॉन्टवरील वाळूसाठ्यासह गौर शिवारातील गट क्रमांक ४०२ मधील बेकायदेशीर खदान व क्रेशर वरील अवैध उत्खननाचे मोजमाप सार्वजनिक बांधकाम व भुमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी यांच्या मार्फत ईटीएस मोजणीनंतर पंचनामा करणे आवश्यक होते परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांशी हितसंबंध जोपासत कंपनीच्या मालकाविरुद्ध कार्यवाही न केल्याने नागरिकांमध्ये तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.....
🌟पुर्णा तहसिलदार बोथीकर यांच्या अनागोंदी कारभारामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल चोरट्यांच्या घशात :-
पुर्णा तहसिलचे तहसिलदार माधवराव बोथिकर व महसूल प्रशासनाचे अधिकारी प्रशांत थारकर यांनी शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या महसुलाची वाट लावण्याचे काम हाती घेतले की काय? असा प्रश्न उपस्थित होत असून तालुक्यात बांधकाम गुत्तेदार कंपन्यांसह खडी क्रेशर चालक नियमबाह्य पद्धतीने प्रचंड प्रमाणात उत्खनन करीत असतांना तहसिलदार व महसूल प्रशासनाची भुमिका संशयास्पद असल्याचे पाहावयास मिळत आहे.
शासकीय नियमानुसार ५ हजार ब्रास उत्खननाची परवानगी देण्याचे अधिकार तहसिलदार यांना तर ६ हजार ब्रास उत्खननाची परवानगी देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी (एसडीपीओ) यांना तर २५ हजार ब्रास उत्खननाची परवानगी देण्याचे अधिकार जिल्हा अधिकारी यांना असतांनाच व त्याच्यापेक्षा जास्त उत्खननासाठी परवानगी देण्याचे अधिकार आयुक्तांना असतात संबंधित मोंटेकार्लो लिमिटेड कंट्रक्शन कंपनीला गौर शिवारातील गट क्रमांक ४०२ मध्ये मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांनी केलेल्या नियमबाह्य बोगस पंचणाम्यानुसार ३५ ते ब्रास अवैध मुरूम व दगड उत्खननाची परवानगी कोणी दिली ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे बेकायदेशीर अनाधिकृत उत्खनन झाल्यास त्या अवैध उत्खननाचा पंचणामा करण्यापूर्वी भुमिअभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करुन अवैध उत्खनन झालेल्या स्थळांची लांबी/रुंदी/खोलीची ईटीएस मोजणी आवश्यक असते परंतु तहसिलदार व महसूल अधिकारी यांनी मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून नियमबाह्य पंचणामा करुन संबंधीत कंपनीला कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे पाहावयास मिळत आहे.....
0 टिप्पण्या