🌟तालुक्यातल्या पंचक्रोशीतील हजारो भाविक या ठिकाणी येऊन हूलपल्ली व खिर महाप्रसादाचा लाभ घेतात🌟
पुर्णा : पुर्णा शहरातील ग्रामदैवत श्री गुरु बुद्धीस्वामी पाडवा यात्रा महोत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले असून या यात्रा महोत्सवात महाप्रसादात हूलपल्ली व खिरीचे मोठे महत्त्व असून नवीन गव्हापासून खीर बनवली जाते व बेसना पासून हुलपल्ली बनवली जाते या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पूर्णा शहरासह तालुक्यातल्या पंचक्रोशीतील हजारो भाविक या ठिकाणी येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात ही परंपरा मागील ८०० वर्षापासून सुरू असून श्री गुरु बुद्धीस्वामी लासीना संस्थान च्या वतीने दरवर्षी आयोजन केले जाते.
या यात्रेसाठी प्रत्येक घरातून पोळ्या दिल्या जातात तसेच पूर्णा शहरासह तालुक्यातील लिंगायत समाज बांधव व सर्व धर्मीय भाविक यात्रे सहभागी होतात त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यावरून पालखी सोहळा काढला जातो हुंलपल्ली व गव्हाच्या खिरीचे मोठे महत्त्व आहे या ठिकाणी दहा क्विंटल गव्हापासून खिर केली जाते या यात्रेत खीर व हुलपल्लीचे मोठे वैशिष्ट्य आहे.....
0 टिप्पण्या