🌟परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातील किन्होळा येथील शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या....!


🌟बँकेचे कर्ज कसे फेडायचं या चिंतेत केली शेतकरी वैजनाथ गंगाराम कदम यांनी आत्महत्या🌟 

परभणी :- परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातल्या किन्होळा येथील ६५ वर्षीय शेतकर्‍याने रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना काल मंगळवार दि.११ मार्च २०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजेच्या सुमारास घडली.

               तालुक्यातील किन्होळा येथील वैजनाथ गंगाराम कदम या शेतकर्‍याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया व जिल्हा मध्यवर्ती बँक अशा दोन बँकांचे मिळून ०३ लाख रुपये कर्ज आहे. ते कसे फेडायचे या विवंचनेत ते असायचे. मागील दोन वर्षापासून होणारी नापिकी व उत्पादित होणार्‍या शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचं या चिंतेत ते होते. त्या चिंतेतूनच त्यांनी आपल्या कॅनॉल जवळ असलेल्या शेत आखाड्यावर पत्र्याच्या आडूला रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती अंगद वैजनाथ कदम यांनी मानवत पोलिसांना दिली. त्यावरुन मानवत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे हे करीत आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या