🌟परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी होलिका आणि रंगोत्सव शिवीमुक्त साजरा करावा.....!


🌟श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आवाहन🌟

परभणी (दि.१२ मार्च २०२५) : होलिका आणि रंगोत्सव हा सण प्रत्येकाने शिवीमुक्त पध्दतीने साजरा करावा असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

          हिंदू संस्कृतीतील होलिका आणि रंगोत्सव किंवा धूळवड हा सण अनेक पद्धतीने साजरा करण्यात येतो. अनेक वर्षांपासून ह्या सणाच्या निमित्ताने होलिका दहन करून दुसर्‍या दिवशी रंगोत्सव साजरा करण्यात येतो. परंतु, मागील काही वर्षापासून हा सण चुकीच्या पद्धतीने साजरा करण्याचा एक पायंडा पडण्यात आलेला आहे. यामध्ये अति प्रमाणात व्यसन करणे, तसेच शिवी देऊन हा सण साजरा करणे, यामुळे चुकीच्या प्रथा पाडण्यात येत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवरच तरुणांमध्ये चांगला संदेश जावा आणि सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित रहावी, या सणाचा आनंद घेता यावा यासाठी ‘शिवीमुक्त होळी’ ही  संकल्पना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या धारकर्‍यांनी 2022 पासून आचरणात आणून समाजात चांगला पायंंडा पाडण्याचा प्रयत्न केला. अनेक तरुण युवक या गोष्टीं अंमलात आणून या संकल्पनेस प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे याहीवर्षी ‘शिवीमुक्त होळी आणि रंगोत्सव’ साजरा करावा, असे आवाहन आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या