🌟पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरविणाऱ्या सल्लागार समितीमध्ये वादग्रस्त अभिनेता राहुल सोलापूरकर....!


🌟अभिनेता राहुल सोलापूरकरने महापुरुषांबद्दल नवा वादग्रस्त वक्तव्य : राज्यात वाद उफाळून येण्याची चिन्हे🌟

पुणे : महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे नाव पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरविणाऱ्या सल्लागार समितीमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने आता आणखी वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पुणे महापालिकेत पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरवण्याचा प्रस्ताव आहे. पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरवण्याच्या सल्लागार समितीमध्ये राहुल सोलापूरकर यांचेही नाव आहे. मागील तीन वर्षांपासून पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरवण्याचे काम सुरू आहे. मात्र, प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे समजते. सोलापूरकर यांचे नाव आधीपासूनच या समितीत आहे मात्र, आता त्यांचे नाव समोर आले आहे. राहुल सोलापूरकर यांच्या नावामुळे वाद उफाळून येण्याची शक्यता आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या