🌟पैशाचे सोंग घेता येत नाही सध्या लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यासारखी परिस्थिती नाही....!


🌟राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली🌟 

✍️ मोहन चौकेकर 

आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार नाहीत, असे नाही. पण सध्या आमची परिस्थिती नाही परिस्थिती बदलल्यावर २१०० रुपये नक्की देऊ. सगळी सोंगं करता येतात, पण पैशांचे सोंग करता येत नाही, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  नांदेड येथे एका सभेत बोलताना दिली.उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक दिवसाच्या दौऱ्यासाठी नांदेड जिल्ह्यात आले होते. नरसी येथील कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री नवाब मलिक, आमदार विक्रम काळे, आमदार प्रतापराव पाटील-चिखलीकर, आमदार राजू नवघरे आदींची उपस्थिती होती.

💫माजी खासदार भास्करराव खतगावकर व माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश :-

याप्रसंगी माजी खासदार भास्करराव पाटील-खतगावकर यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, मीनल खतगावकर यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.‘छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. अशा वेळी आज आपल्या महाराष्ट्रात काही वेगळ्या घटना घडतात. त्यामुळे मनाला वेदना होतात शेवटी आपण हाडामासाची माणसं आहोत, सगळ्यांमध्ये लालच रक्त आहे. पण कुठेतरी राजकीय पोळी भाजण्याकरिता समाजांमध्ये तेढ निर्माण करायचे आणि त्याच्यातून समाज दुभंगेल कसा हे साधायचे. यातून शेती, रस्ते, वीज, पाणी, रोजगाराचे प्रश्न सुटणार आहेत का ?’ असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

💫नांदेड येथेही इनोव्हेशन सेंटर उभारणार :-

चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी येथे इनोव्हेशन सेंटरला मंजुरी देण्यात आली आहे, तर मराठवाड्यातील युवकही मागे राहू नयेत, याकरिता नांदेड येथेही इनोव्हेशन सेंटर सुरू होणार आहे. यासोबत बीड व छत्रपती संभाजीनगर येथेही असे सेंटर सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या सेंटरच्या माध्यमातून युवकांना विविध कोर्स करता येतील, यासाठी टाटा कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. 

आर्ट, सायन्स, कॉमर्स या कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्याला सेंटरमधून विविध कोर्स करता येणार आहेत. एका सेंटरसाठी जवळपास १९५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी १६५ कोटी टाटा कंपनी देणार आहे, तर उर्वरित रक्कम ‘डीपीडीसी’मार्फत सरकार देईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेड येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले मलाही राज्याच्या १३ कोटी जनतेचा हिशोब ठेवावा लागतो शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे अनेक जण बोलतात. कृपा करून तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा ७ लाख २० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. 

यामध्ये पेन्शन, कर्मचाऱ्यांचे पगार, राज्य सरकारने काढलेल्या कर्जांचे व्याज जाईल. यातून राहिलेला पैसा माझ्या लाडक्या बहिणींसाठी आहे. पण आता मी सगळा हिशोब केला. तुम्ही जसा तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब ठेवता, तसा मला राज्याच्या १३ कोटी जनतेचा ३६५ दिवसांचा हिशोब ठेवावा लागतो. मी आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करतोय, असे अजित पवार म्हणाले.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या