🌟परभणी स्थानकावर आंदोलन करण्याचा मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने दिला इशारा🌟
परभणी (दि.२४ मार्च २०२५) - मध्य रेल्वे विभागांकडून लातूर मार्गे घोषित नांदेड-लोकमान्य तिलक टर्मिनल (मुंबई) उन्हाळी विशेष रेल्वेचा सोयीस्कर वेळापत्रकात दमरे ने खाडाखोड करून ६ तास अतिरिक्त लूज टाइम निर्धारित करण्यात आले, या अन्यायाचा निषेध करण्यासाठी परभणी स्थानकावर आंदोलन करण्याचा इशारा मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने दिला आहेत.
या बाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की नुकतेच मध्य रेल्वे विभागाने मुंबई (एलटीटी) ते नांदेड दरम्यान विशेष रेल्वेची घोषित केली आहेत. त्यात सदर रेल्वे मुंबई (एलटीटी) येथून मध्य रात्री १२.५५ ला निघून नांदेडला दुसर्या दिवसी सायंकाळी ७ ला पोहोचणार होती मात्र दक्षिण-मध्य रेल विभागातील अधिकारी त्यात ४ तास अतिरिक्त लूज टाइम जोडून मुंबई ते नांदेड २० तासांची करून टाकली आहेत. एक तर मराठवाडा विभागात प्रवाश्यांचा सोईनुसार गाड्याची सुविधा नाही, त्यावर आता सोयीस्कर वेळापत्रक बिघडवण्याची कट दक्षिण-मध्य विभागातील अधिकारी करीत आहेत. सध्य स्थितीत मुंबईहून नांदेड साठी धावणारे देवगिरी, नंदिग्राम, तपोवन आणी राज्यराणी या सर्व रेल्वे १२ तासांत धावत असताना या घोषित विशेष रेल्वेत तीस टक्के जास्त भाडे दऊन २० तास पर्यंतचा कंटाळवाणे प्रवास कोण करणार? याच कारणाने सहजच सदर रेल्वेचा प्रतिसाद मिळणार नाही, तेव्हा हेच कारण पुढे करून विशेष गाडीला रद्द करण्याची डाव दक्षिण-मध्य विभागातील अधिकारी चालविली असून निषेधार्ह आहे. तरी दक्षिण-मध्य रेल विभागाने लूज टाइम रद्द करून सोयीस्कर वेळापत्रकानुसार सदर रेल्वे चालवावी, तत्काल परभणी-संभाजी नगर मार्गावरून उन्हाळी विशेष रेल्वे सोडण्यात यावेत अन्यथा परभणी स्थानकावर अंधोलन करण्याची इशारा मराठावाडा रेल्वे प्रवासी महासंघाकडून अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, राजेंद्र मुंढे, रितेश जैन, कदीर लाला हाश्मी, बाळासाहेब देशमुख, श्रीकांत गडप्पा, रूस्तम कदम, माणिकराव शिंदे, दयानंद दीक्षित, दशरथ माकणे, श्रीकांत अंभोरे, विठ्ठल काळे इत्यादीने दिली आहेत.....
0 टिप्पण्या