🌟देशातील वाढत्या गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर....!


🌟राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली सादर🌟

मुंबई : देशातील वाढत्या गुन्हेगारीत महाराष्ट्र राज्य आठव्या क्रमांकावर असल्याची गंभीर बाब राज्यातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भातील आकडेवारी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बुधवार दि.१९ मार्च २०२५ रोजी राज्य विधानसभेत सादर केली गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आठव्या स्थानी आहे दिल्ली,केरळ,हरयाणा,तेलंगणा, मध्य प्रदेश,ओडिशा,आंध्र प्रदेश ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


“दोन दिवसांपासून चर्चेत आलेल्या नागपूर शहराचा सातवा क्रमांक लागत आहे. नागपूरमध्ये आपण नागपूर ग्रामीणचा जवळपास २५ टक्के भाग हा सामील केला. २०२३च्या तुलनेत २०२४ मध्ये गुन्ह्यांच्या संख्येत २,५८६ ने घट झाली आहे," अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. मुंबईसारखे शहर हे पंधराव्या क्रमांकावर आहे. पुणे १८व्या स्थानी आहे. पहिल्या क्रमांकावर दिल्ली आहे, दुसऱ्या क्रमांकावर जयपूर आहे. तिसऱ्या क्रमांकावर इंदूर आहे. चौथ्या क्रमांकावर कोची आहे. पाचव्या क्रमांकावर पाटणा आहे. त्यानंतर गाझियाबाद, कोझीकोडचा क्रमांक लागतो, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या