🌟राज्यातील पुणे अहिल्या नगरसह कोकणातील शासकीय धान्य गोदामातील हमाल माथाडी १८ मार्चपासून संपावर...!


🌟या जिल्ह्यांतील शासकीय स्वस्त धान्य दुकानांचा धान्य पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता🌟

मुंबई :- राज्यातील पुणे अहिल्या नगरसह कोकणातील शासकीय स्वस्त धान्य गोदामात काम करणारे हमाल माथाडी कामगारांनी दि.१८ मार्च २०२५ पासून आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे या जिल्ह्यांतील शासकीय स्वस्त धान्य दुकानांचा धान्य पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शासकीय धान्य गोदामात काम करणाऱ्या माथाडी कामगारांना माथाडी कायदा तसेच माथाडी मंडळाच्या तरतुदी लागू करण्याचा निर्णय २००५ मध्ये घेण्यात आला. मात्र, माथाडी अधिनियम, जिल्हा माथाडी मंडळाच्या योजनेच्या तरतुदी लागू करण्यासंदर्भात जिल्हा पातळीवर हलगर्जीपणा केला जात असल्याचा आरोप अखिल भारतीय माथाडी, सुरक्षा रक्षक, श्रमाजीवी आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस अरुण रांजणे यांनी केला आहे.

माथाडी कामगारांची सेवा अत्यावश्यक सेवा गटात येत असल्यामुळे त्यांना संप व आंदोलन करण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका सर्व जिल्ह्यातील प्रशासन घेत आहे. परंतु या कामगारांनी आंदोलन करू नये यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे मंजूर सेवा सुविधा त्यांना देण्याबाबत मात्र टाळाटाळ केली जाते. मजुरी, लेव्ही, महागाई भत्ता वाढीची रक्कम तीन ते सहा महिने विलंबाने जमा केली जाते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या