🌟पुर्णा शहरात शहीद दिनाच्या पार्श्वभूमीवर डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित कँडल मार्च संपन्न....!


🌟यावेळी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे परभणी जिल्हा सचिव कॉम्रेड नसीर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती🌟 


पुर्णा :-
पुर्णा शहरात काल रविवार दि.२३ मार्च २०२५ रोजी थोर क्रांतिकारक शहीद सरदार भगतसिंघ,राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा संघटनेच्या वतीने भव्य कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते
.

डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा संघटनेच्या वतीने रविवार दि.२३ मार्च रोजी सायंकाळी ०७.०० ते ०८.०० वाजेच्या दरम्यान पुर्णा शहरातील झिरो टी पॉईंट पासून मुख्य रस्त्याने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर असा कँडल मार्च काढण्यात आला होता यावेळी डिवायएफआयचे जिल्हा सचिव कॉम्रेड नसीर शेख,अजय खंदारे,सचिन नरनवरे, वर्षा पाटील, किशोर उघडे, भूषण भुजबळ, भाऊराव बेंडे, विलास खाडे, सुबोध खंदारे, निरंजन खंदारे, शुभम गायकवाड, कैलाश आनंदे, पवन आसोरे, मनोहर अहिरे, सम्राट गायकवाड, आशिष परसोडे, नितीन वाव्हळे, राम खंदारे, सचिन पाटील व श्रीमती पाटील, गार्गी उघडे, अरहत रणवीर आदी या कँडल मार्च मध्ये सामील होते. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांनी मार्चला पाठिंबा देत मनोगत व्यक्त केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या