🌟पुर्णेतील स्वा.सै.सूर्यभानजी पवार महाविद्यालयाचे प्रा.डॉ.संजय कसाब करिअर कट्टा उत्कृष्ट समन्वयक पुरस्काराने सन्मानित....!


🌟त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे🌟


पुर्णा (दि.१८ मार्च २०२५)
- पुर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील मराठी विभागाचे अभ्यासू प्राध्यापक, कवी डॉ. संजय कसाब यांना महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या अंतर्गत करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याविषयी अधिक माहिती अशी की, नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाच्या  शंकरराव चव्हाण सभागृहात महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, माजी मंत्री डी.पी. सावंत, विभागीय सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर, करियर कट्टयाचे राज्य समन्वयक डॉ. यशवंत शितोळे यांच्या हस्ते डॉ. कसाब यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 प्रा.डॉ.संजय यांचे विविध  सामाजिक व सांस्कृतिक विषयावर लेखन प्रसिद्ध झालेले असून त्यांचे राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय परिषदा व चर्चासत्रांमध्ये चाळीसपेक्षा अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत . याशिवाय त्यांचे चार संपादित ग्रंथ असून ' स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार : जीवन व कार्य ' हे चरित्र त्यांनी लिहिलेले आहे. विविध वर्तमानपत्रे, नियतकालिके व आकाशवाणी वरून त्यांच्या कथा ,कविता व वैचारिक लेखन  प्रकाशित आहे  साठोत्तरी मराठी साहित्यातील आंबेडकरी विचारांचा प्रभाव : एक विवेचक अभ्यास " या विषयावर त्यांनी पीएच.डी. चे संशोधन पूर्ण केले आहे. तर " परभणी जिल्ह्यातील दलित लोकगीतांचा अभ्यास " हा युजीसी ,नवी दिल्ली येथे  लघुशोध संशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे .

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव तथा प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार,अध्यक्ष गुलाबराव कदम, महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी व मित्र मंडळी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे महाविद्यालयात प्राचार्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भारतातील सर्व प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या