🌟सतीश भोसलेचं घर पाडण्यासाठी अती घाई केली : आमदार सुरेश धस बिड जिल्हाधिकारी यांना जाब विचारणार🌟
1) महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती; विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाचा पुण्यातून इशारा ; औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष, हिंदू परीषदेसह बजरंग दलानं स्टंट करु नये : हर्षवर्धन सपकाळ
2) कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या, शिवसेना ठाकरे गटाची मागणी, न्यायालयाच्या निर्णयावर संताप, ; कर नाही त्याला डर कशाला, मी कधीही चुकीचे काम करत नाही, न्यायालयाच्या निरीक्षणावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य
3) सतीश भोसलेचं घर पाडण्यासाठी अति घाई केली; आमदार सुरेश धस जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारणार
4) शेतकरी आत्महत्येची बाब चिंताजनक, या मुद्यावर राज्य अन् केंद्र सरकारनं लक्ष घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करु, शरद पवारांचं वक्तव्य ; शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहिल्याबद्दल मानले आभार ; महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
5) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या ताटाखालचे मांजर, ते काँग्रेसमध्ये जाणार होते, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा मोठा दावा ; नाना पटोलेंनी लवकर भांडं वाजवलं, जरा थांबायला हवं होतं, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दिलेल्या ऑफरवरून संजय राऊतांचा टोला
6) लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, माझ्या विभागाला एकूण 7 हजार कोटींचा फटका, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे वक्तव्य ; जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा ; राष्ट्रीय स्वंयसेवक संघ विष आहे, त्यांच्याकडून देशाचा आत्मा नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु; तुषार गांधींच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक
7) यशवंतराव चव्हाणांनी साकारलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा घाट, तेलंगणातील भाजपचे आमदार टी.राजा कोल्हापुरातील मोर्चात सहभागी होणार ; बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा ; कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
8) पनवेल हादरले! बसस्टॉपवर सोडतो म्हणत अज्ञातस्थळी गाडी नेली, इको चालकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार ; बीडमध्ये शिक्षकाने संपवले जीवन; फेसबुक पोस्ट लिहिल्याने उडाली खळबळ, पोलीस तपास सुरू
9) 'छावा'चा बॉक्स ऑफिसवर नादखुळा परफॉर्मन्स; 'पुष्पा 2'वरही केली मात, फक्त एकाच महिन्यात 540.38 कोटी रुपयांची वसुली ; क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर चित्रपटसृष्टीत करणार पदार्पण; साऊथ फिल्म डेब्यूसाठी सज्ज, FIRST LOOK रिलीज
10) द हंड्रेड लीगमध्ये पाकिस्तान क्रिकेटमधील खेळाडूंच्या इज्जतीचा फालुदा, 45 खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलं; पण एकालाही कोणी विकत घेतलं नाही ; महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये होणार अंतिम सामना
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या