🌟पतसंस्थेव्दारा पतसंस्थेच्या महिला संचालिका व महिला कर्मचाऱ्यांचा कार्यकतृत्वाबद्दल करण्यात आला सत्कार🌟
✍️ मोहन चौकेकर
चिखली : जागतिक महिला दिनाचे औचित्यं साधुन दि.०८ मार्च २०२५ रोजी चिखली शहरातील अग्रगण्यं पतसंस्था असलेल्या बालाजी अर्बन पतसंस्थेव्दारा आपल्या पतसंस्थेच्या महिला संचालिका व महिला कर्मचाऱ्यांचा कार्यकतृत्वाबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड मंगेश व्यवहारे हे होते. तर संस्थेचे उपाध्यक्ष सत्यनारायण लढ्ढा , जेष्ठ संचालक नारायणराव खरात , पतसंस्था फेडरेशनचे तज्ञ संचालक तथा संस्थेचे संचालक सुदर्शन भालेराव , संचालक नारायण भवर , संचालिका श्रीमती पुष्पाताई राजपूत, सरव्यवस्थापक अनिल गाडे , सहाय्यकं सरव्यवस्थापक अशोक नाईक , जेष्ठं कर्मचारी रमेश देशमुख , तांत्रीक सल्लागार शार्दुलभाऊ व्यवहारे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ॲड मंगेश व्यवहारे म्हणाले की , समाजात महिलांबद्दल आदराची भावना निर्माण करणे आणि त्यांना पुरुषांप्रमाणे समान अधिकार मिळवून देणे हा महिला दिनाचा मुख्य उद्देश आहे. हा दिवस जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आज महिला प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत आहेत. शिक्षण असो, विज्ञान असो, राजकारण असो की क्रीडा असो, उद्योग-व्यवसाय असो, उद्योजकता असो, सर्वत्र महिला आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. आपण महिलांचा आदर केला पाहिजे आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात समान संधी दिली पाहिजे.आजची नारी ही अबला नसून सबला आहे. तिचे कार्यकतृत्वं सिध्दं करण्यासाठी तिला आभाळ देणे गरजेचे आहे. व बालाजी अर्बन पतसंसथा महिलांना व्यासपीठ उपलब्धं करुन देण्याचा कायमच प्रयत्नं करीत असल्याचेही ते म्हणाले.
याप्रसंगी संस्थेच्या संचालिका श्रीमती पुष्पाताई राजपूत यांच्यासह संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या सौ वर्षा पाटील, सौ. किरण हिवाळे,सौ.प्रतिमा नवले,सौ छाया गायकवाड,सौ.वृंदाविनी घ्याळ,सौ आरती जोशी,सौ. जयश्री पद्मे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे सरव्यवस्थापक अनिल गाडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले अशी माहिती प्रसिध्दीप्रमुख विष्णु इंगळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविली आहे......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या