🌟महिला उन्नती संस्थेतर्फे पुरस्कार प्रशस्तीपत्र व 'नारी शक्ती - सन्मानपत्र' देऊन,जागतिक महिला दिनी त्यांचा गौरव🌟
परभणी - ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देत कार्यरत असलेल्या प्राचार्या रजनीताई मोहनराव मोरे यांना, त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावरील महिला उन्नती संस्थेतर्फे पुरस्कार प्रशस्तीपत्र व ' नारी शक्ती - सन्मान ' पत्र देऊन, जागतिक महिला दिनी त्यांचा गौरव केला आहे.
दिनांक आठ मार्च 2025 रोजी महिला उन्नती संस्था भारत, नवी दिल्लीचे महाराष्ट्र प्रभारी तथा इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष,धर्मभूमी चे संपादक मदन (बापू )कोल्हे यांनी, ग्रामीण भागामधील मुलींना, त्यांचे जीवनमान उंचावून,त्यांना सक्षम करण्यासाठी, शैक्षणिक प्रवाहामध्ये सामील करून घेऊन, गेल्या 35 वर्षापासून उत्कृष्टरित्या कार्य करीत असलेल्या ,श्री अन्नपूर्णा देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आरळ ता.वसमत जि. हिंगोली च्या प्राचार्या श्रीमती रजनीताई मोहनराव मोरे यांचा नवी दिल्ली येथील महिला उन्नती संस्था भारत तर्फे शिक्षा अभियानां अतर्गत 'प्रशस्तीपत्र पुरस्कार' व 'नारीशक्ती - सन्मानपत्र' देऊन गौरव केला आहे .
याप्रसंगी महीला उन्नती संस्थाचे महाराष्ट्र मीडिया प्रमुख तथा इरा चे मीडिया इनन - चार्ज , मा.विशेष कार्यकारी अधिकारी,वैभवज्वाला चे संपादक देवानंद शंकरराव वाकळे यांची उपस्थिती लाभली होती....
0 टिप्पण्या