🌟पुर्णा नगर परिषद प्रशासक व मुख्याधिकारी यांच्या निष्क्रिय कारभारा विरोधात भारतीय जनता पक्षाने काढला मोर्चा.....!


🌟शहरातील खंडीत पाणीपुरवठा तात्काळ सुरू करण्यासह विविध नागरी सुविधांची तात्काळ पुर्तता करण्याची निवेदनाद्वारे मागणी🌟 

पुर्णा (दि.१८ मार्च २०२५) :- पुर्णा नगर परिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी यांच्या निष्क्रिय व गलथान कारभाराचा फटका शहरातील नागरिकांना सातत्याने बसत असून शहरातील नागरिकांना मुलभूत नागरी सुविधांपासून सतत वंचित राहावे लागत आहे पुर्णा नदीवरील कोल्हापूरी बंधाऱ्यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असतांना देखील पाणीपुरवठा विभागातील जॅकवेल मधील विद्युत मोटार जळाल्याचे कारणाणे पुर्णा शहरात मागील पंधरा ते वीस दिवसांपासुन नळाला पाणी येत नसल्यामुळे नागरीकांची पाण्याअभावी तारांबळ उडाली असुन शहरातील नागरीक व महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने नगर परिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी यांच्या निष्क्रिय व गलथान कारभारा विरोधात आज मंगळवार दि.१८ मार्च रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने घागर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.


भारतीय जनता पक्षाच्या मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की सध्या भर उन्हाळ्याचे दिवस असुन नुकताच होळी/धुलीवंदनाचा सन झाला शिवाय मुस्लिम समाजाचा रमजानचा महिना चालु आहे अशा सनासुदीला नेमके १५ ते २० दिवसांपासुन नळाचे पाणी बंद आहे. या बाबत आपले कार्यालयाकडे दि.१३ मार्च २०२५ व दि.१७ मार्च २०२५ या संदर्भीय पत्राद्वारे विनंती केली असता आपणाकडुन आमच्या पत्राची दखल घेण्यात आली नाही म्हणुन भाजपच्या वतीने आज दि.१८ मार्च रोजी घागर मोर्चा काढण्यात आला आहे तरी मुख्याधिकारी साहेबांनी आमच्या खालील मुलभूत नागरी सुविधां संदर्भातील मागण्या त्वरीत पूर्ण करण्यात याव्यात असेही नमूद केले असून भाजपच्या वतीने निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत त्या अशा....पूर्णा शहरात फिल्टरचे नळाद्वारे शुध्द पाण्याचा पुरवठा त्वरीत करण्यात यावा,पूर्णा शहरात सर्वत्र धानीचे साम्राज्य पसरले आहे तरी त्वरीत स्वच्छता करण्यात यावी व धुर फवारणी करण्यात यावी,पूर्णा शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे त्वरीत मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा,पूर्णा शहरातील न.प.च्या सर्व धर्मशाळेवर झालेले अतिक्रण त्वरीत काढण्यात यावे,पूर्णा शहरातील घरकुल लाभधारकांचे बांधकामा प्रमाणे त्वरीत हप्ते टाकण्यात यावेत या न्यायिक मागन्यांवर प्रशासक जिवराज डाफकर व मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण शहरातील नागरिकांचे लक्ष लागले असून भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी उत्कर्ष यांना देण्यात आलेल्या निवेदनावर साधनाताई बिछडे भा.ज.पा.म.मो. शहराध्यक्ष,सविताताई गुंडाळे भा.ज.पा.म.मो.जि.सचिव,सौ.रत्नमाला एकलारे भा.ज.पा.म.मो.जि. उपाध्यक्ष,सिमरन कुरेशी मा.ज.पा.म.मो. शहरउपाध्यक्ष,शोभा खाकरे,करूनाबाई शहाणे,महादेवी एकलारे,सुमित्रा वळसे,भाग्यश्री भायेकर,उमादेवी लाईतबार,सरोजनी कुदमुळे,प्रनिता मिटकरी,प्रशांत कापसे भा.ज.पा. शहराध्यक्ष,बाळासाहेब कदम भा.ज.पा.मा.जि. सरचिटनिस,मधुकर मुळे भा.ज.पा.ता.उपाध्यक्ष,बालाजी कदम भा.ज.पा.मा.जि. चिटनिस,डॉ.अजय ठाकुर भा.ज.पा.मा.अध्यक्ष,ज्ञानोबा कदम भा.ज.पा.युवा शहरध्यक्ष,राम चापके भा.ज.पा.ता.सरचिटनिस,रावजी शेंडगे भा.ज.पा.ता.उपाध्यक्ष,शेख आमिन शेख अब्दुला भा.ज.पा.प्र.सचिव,रोशन एकलारे भा.ज.पा.सदस्य,हनुमान अग्रवाल भा.ज.पा.जि. कोषाध्यक्ष,सुनिल डुब्बेवार भा.ज.पा.सदस्य,राज ठाकर भा.ज.पा.सदस्य,वैभव भायेकर भा.ज.पा.सदस्य,मनोहर शहाणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या