🌟महाराष्ट्र राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट येणार ? अवकाळी पावसाचे संकट तुर्तास टळले....!


🌟येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील तापमान सरासरीपेक्षा थोडे कमी राहण्याची शक्यता🌟

मुंबठं :- महाराष्ट्र राज्यात अवकाळी पावसाचे संकट तुर्तास टळले असले पुढील १५ दिवस अवकाळी पावसाची शक्यता कमी असून राज्यातील हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील तापमान सरासरीपेक्षा थोडे कमी राहण्याची शक्यता आहे ज्यामुळे रब्बी पिकांना दिलासा मिळेल. 

 महाराष्ट्रातील कमाल तापमान सध्याच्या परिस्थितीत ३६ डिग्री दरम्यान आणि किमान तापमान १८-२० डिग्री दरम्यान आहे जे सामान्य मानले जाते. पुढील काही दिवस तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे, पण तरीही ते सरासरीपेक्षा कमीच राहील. मागील आठवडयात ३-४ दिवस एकाकी झालेल्या दिवसाच्या कमाल तापमान वाढीतून उष्णतेमुळे कांदा, गहू सारख्या रब्बी पिकावर विपरित परिणाम जाणवला. परंतु अवकाळीच्या ह्या वातावरणामुळे लगेचच २-३ डिग्रीने घसरलेल्या कमाल व किमान तापमानामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या दिवसाचे कमाल तापमान, कोकणात ३०-३२ तर उर्वरित महाराष्ट्रात ३६ डिग्री दरम्यान आणि किमान तापमान हे १८-२० डिग्री दरम्यान जाणवत आहे. ही दोन्हीही तापमाने सरासरी इतक्याच श्रेणीत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या