🌟अजित पवार व एकनाथ शिंदे यांना आलटून-पालटून मुख्यमंत्री बनवून टाकू ; त्यांनी आमच्यासोबत यावं - नाना पटोले
✍️ मोहन चौकेकर
1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब धुलीवंदन,रंगपंचमी केली साजरी, महाराष्ट्रातील जनतेला दिल्या शुभेच्छा ; आनंद दिघे यांनी सुरु केलेली परंपरा कायम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आनंदाश्रमात धुळवड ; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी साजरी केली धुळवड, 'शिवतीर्थ'वर ठाकरे कुटुंब रंगलं
2. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, सक्तीच्या रजेवर असलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि केज जिल्हा न्यायाधीशांची एकत्रित धुळवड, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा दावा; फोटोही शेअर केले
3. मला काहीही करून कुठेतरी ढकलायचं, असं सगळ्या प्रसारमाध्यमांनी ठरवलेलं दिसतंय; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण; 'माझी गॅरंटी घेऊ नका, माझे काही खरे नाही', हे वक्तव्य शक्तिपीठ महामार्गाबाबत असल्याचा खुलासा
4. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना आलटून-पालटून मुख्यमंत्री बनवून टाकू; त्यांनी आमच्यासोबत यावं, काँग्रेस नेते नाना पटोले यांची ऑफर
5. बीडमधील मारहाण प्रकरणातील आरोपी आणि वन्यप्राण्याची कत्तल करणाऱ्या सतीश उर्फ खोक्या भोसलेला सहा दिवसांची पोलीस कोठडी; न्यायालयात सतीश भोसले सामाजिक कार्यकर्ता असल्याचा वकिलांचा दावा ; सतीश भोसलेचा मोबाईल बीड पोलिसांकडून जप्त; फरार असताना खोक्याला मदत करणारे ही रडारवर ; घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्याच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
6. कळमकरांना नव्हे, तुम्हाला तिकीट देतो; आमदारकीचं गाजर दाखवून अहिल्यानगरच्या काँग्रेस महिला पदाधिकारी मंगल भुजबळ यांची लाखो रुपयांची फसवणूक, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष बालराजे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल ; नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याने व्यापाऱ्याला धमकावलं, 15 वर्षांच्या मुलीवर हात टाकल्याचा आरोप, कुंदलवाल बाप-बेटा पोलिसांच्या कचाट्यात
7. सोलापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव! मृत पावलेल्या कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे समोर ; प्रशासन अलर्ट मोडवर, नागरिकांना आवाहन ; सोलापुरात उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली, सर्व शाळा सकाळच्या सत्रात घेण्याच्या महापालिका प्रशासनाचे सक्त आदेश
8. मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; एकूण पाच गाड्या इटारसीमार्गे नागपूरला वळवल्या ; रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! 20 ते 30 मार्चदरम्यान अनेक गाड्या रद्द
9. आधी दारू पाजली, नंतर शेतात नेत जेवणाचा बेत आखला; अनैतिक संबंधाच्या कारणातून मित्रानेच मित्राला निर्घृणपणे संपवलं; गोंदियातील घटनेनं खळबळ ; डोंबिवलीत रंगाचा बेरंग, रंगाचा फुगा लागल्यानं वाद, तरुणावर धारधार शस्त्रानं जीवघेणा हल्ला ; 'भावाला खुन्नस देऊन बघतो...', रागातून तरुणावर चार जणांकडून जीवघेणा हल्ला, सोलापूर जिल्ह्यातील बार्शीची घटना
10. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा नवा कॅप्टन, केएल राहुलनं नकार देताच अक्षर पटेलवर मोठी जबाबदारी ; इंग्लंडचा आक्रमक खेळाडू हॅरी ब्रूक वर आयपीएलमध्ये 2 वर्षांची बंदी; बीसीसीआयच्या निर्णयाने जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ ; साठी 10 संघांचे कर्णधार ठरले, 5 नव्या दमाचे खेळाडू करणार नेतृत्व
11. 25 वर्षांची ओळख, 60 व्या वर्षी प्रेमाची कबुली, आमीर खानची नवी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट त्याच्याच कंपनीत काम करते
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या