🌟मराठवाडा विभागीय कृषी मोहत्सवात प्रयोगशील शेतकऱ्यांचा होणार सन्मान...!


🌟परभणीतील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम मैदान येथे विभागीय कृषी महोत्सवाचे दि.०७ ते १० मार्च पर्यंत आयोजन🌟

परभणी (दि.०२ मार्च २०२५) - परभणी येथे श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) आयोजित विभागीय कृषी महोत्सवात मराठवाड्यातील शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रयोगशील शेतकरी,उद्योजक शेतकरी,अधिकारी यांना मान्यवरांचे हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे यात "पूर्णा तालुका शेती सेवा ग्रुप" च्या विविध तालुक्यातील शेतकऱ्यांची निवड झाली असून निवड झालेल्या शेतकऱ्यांना आयोजक श्री स्वामी समर्थ केंद्राचे मराठवाडा प्रमुख संदीप देशमुख यांच्या सहीने निवड झाल्याचे पत्र पाठवले आहेत.

           दि. ७ मार्च ते १० मार्च रोजी परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम मैदान येथे विभागीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात कृषी प्रदर्शन व तज्ज्ञांचे चर्चासत्र,मराठवाडा संस्कृती दर्शन, वनौषधी,रानभाज्या व देशी बियाणे,मोफत आरोग्य व व्यसनमुक्ती शिबिर ,शेतकरी वधू वर परिचय मेळावा, कृषिसह इतर क्षेत्रातील रोजगार मेळावा चे आयोजन केले असून याच कृषी मोहत्सवात मराठवाड्यातील कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या,यशस्वीपणे व अखंड मेहनतीने आपल्या शेतीमध्ये विवध प्रयोग करणारे शेतकरी व शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारणारे  शेतकरी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे यात "पूर्णा तालुका शेती सेवा ग्रुपच्या" माध्यमातून शेतीत विविध प्रयोग यशस्वी करणारे

१)मंगेश देशमुख पेडगाव,परभणी,

२)पंडित थोरात,खानापूर,परभणी 

३)प्रताप काळे धानोरा काळे,परभणी

 ४)पांडुरंग शिंदे लिमला,परभणी 

५)संतोष पवार  लोहा,नांदेड 

६) विष्णुराजे इंगोले कुरुंदा,हिंगोली 

७) विश्वनाथ होळगे,दापशेड,नांदेड

८) विष्णु निर्वळ रूढी,परभणी

या शेतकऱ्यांची निवड झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे या भव्य अशा विभागीय कृषी मोहत्सवात मोठ्याप्रमाणात नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सेवेकरी व समन्वयक बालासाहेब शिंदे यांनी केले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या