🌟महिलांनीं आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेच - डाॅ.श्रध्दाताई विनय वाघमारे


🌟महाराष्ट्र ग्रामीण व युवक विकास मंडळ व सा.देवगिरी एक्स्प्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात त्या म्हणाल्या🌟 


पुर्णा (दि.१२ मार्च २०२५) :- आजच्या आधुनिक महिलानां नेहमी कटुबांची काळजी घ्यावी लागत असल्या मूळे  स्वताःच्या शारीरिक व मानसिक आरोग्य कडे दुर्लक्ष करून चालणार नाही तर आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन येथील वैद्यकीय क्षेत्रातील डाॅ.श्रध्दाताई विनय वाघमारे यांनी केले.


येथील महाराष्ट्र ग्रामीण व युवक विकास मंडळ व साप्ताहिक देवगिरी एक्स्प्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला मेळाव्यात त्यानीं महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करताना केले कार्यक्रमात अध्यक्षा म्हणून सौ.मीनाताई विजयकुमार कदम ह्या होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका सौ प्रेमाताई एकलारे सौ.सुक्षम जोगदंड,सौ.विजयाताई कापसे,सौ सारिका टाकळकर  ह्या होत्या. 

यावेळी सौ आम्रपाली सोनुले , पुर्णेतील उद्योजिका सौ. मीरा संजय यशके  ,कवियञी कु साक्षी शिवाजी कदम  मीरा कदम  कु.मगर या कर्तृत्वान महीलांचा संत्कार याप्रसंगी डॉ. श्रद्धा वाघमारे याचां हस्ते करण्यात आला प्रमुख पाहुण्या सौ.प्रेमाताई एकलारे यानीं महिलांनी वाचन छंद जोपासला पाहिजे व जीवनात वाचनाचे महत्त्व विशद करून देतांना आपण पुस्तके वाचून काढली तर लहान मुलांना देखील वाचनाची आवड निर्माण होईल व मोबाईल पासुन ते सहज दुर जातील असे त्यांनी वाचनाचे महत्त्व विषद केले.

याप्रसंगी सौ.विजयाताई कापसे सौ.आमर्पाली सोनुले  सौ .मीरा यशके यानीं यावेळी विचार मांडले यावेळी कवियञी साक्षी कदम हिने आपली बहारदार कविता सादर केली. कार्यकमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रदिप कदम यांनी केले कार्यक्रमात सुञसंचालन जगदिश जोगदंड  यानीं केले तर आभारप्रदर्शन अतुल शहाणे यानीं केले  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतिश टाकळकर  बालाजी कदम ज्ञानोबा कदम ,ओंकार कदम अजय केवडे  , संजय यशके  यानीं परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या