🌟शिव,फुले,शाहू,आंबेडकर विद्यार्थी हक्क समितीच्या शिष्टमंडळाने छ.संभाजीनगर येथील मंत्री शिरसाट यांची भेट घेतली🌟
नांदेड :- नांदेड येथील शिव,फुले,शाहू,आंबेडकर विद्यार्थी हक्क समितीच्या शिष्टमंडळाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेतली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अभि छात्रवर्ती BANRF 2023 ची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023- 24 या शैक्षणिक वर्षातील प्रलंबीत रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, भारत सरकार शिष्यवृत्ती व स्वाधार शिष्यवृत्ती रकमेत महागाई भत्त्यानुसार वाढ करण्यात यावी, ज्या विद्यार्थ्यांनी वस्तीगृहात अर्ज केला अशा सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पात्र करून स्वाधारचा लाभ देण्यात यावा, भारत सरकारला VPDA प्रणालीतून वगळण्यात यावे, व स्वाधारसाठी 50% ची जाचक अट रद्द करण्यात यावी या प्रमुख मागण्या घेत *शिव,फुले,शाहू,आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती समन्वयक- अक्षयकुमार गायकवाड,प्रबुद्ध काळे,श्रीकांत चव्हाण,रोहित आढाव,अमोल पटेकर,निखिल महाबळे,रोहित सोनकांबळे,प्रतीक्षा कांबळे,अंजली सूर्यवंशी व आदी यावेळी उपस्थित होते......
0 टिप्पण्या