🌟भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रीमुक्तीमध्ये योगदान.......!


🌟'हिंदू कोड बील' म्हणजे आज जी स्त्री आकाशात उंच भरारी ज्या पंखाच्या आधारे घेते त्या पंखाच नाव म्हणजे 'हिंदू कोड बील'🌟

✍️लेखिका : पी.आर.डंबाळे 

जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये 8 मार्च हा दिवस साजरा केला जातो स्त्री ही धर्माच्या अनिष्ट रूढी,परंपरा, चालीरितिमध्ये  बांधलेली होती त्या स्त्रीला या जोखडातून मुक्त करुण तिच्या पंखात बळ देण्याचं कार्य या पृथ्वीतलावर जर कोणी केले असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी. असं म्हणतात प्रत्येक कर्तृत्वान पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते. पण आज भारतातल्या प्रत्येक स्त्रीच्या कर्तृत्वाचा एकमेव शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती, धर्माच्या स्त्रीला उदारअंतःकरणाने दिलेलं दान म्हणजे" हिंदूकोड बील "हिंदू कोड बील म्हणजे आज जी स्त्री आकाशात उंच भरारी ज्या पंखाच्या आधारे घेते त्या पंखाच नाव म्हणजे "हिंदू कोड बील "आहे. स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार या देशातील मनुस्मृतीने नाकारले. त्याचं स्त्रीच्या पदरात बाबासाहेब यांनी हिंदू कोड बील देऊन तिच्या प्रगतीची सर्व दारे उघडली. अमेरिका हा देश जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश आहे. आणि सर्व जगावर राज्य करणारा असा बलशाली राष्ट्र आहे मात्र त्या देशाला स्वातंत्र्य मिळुन 150 हुन अधिक वर्ष होऊनही तेथील स्त्रीला मतदानाचा अधिकार नव्हता. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहताच तो अधिकार महिलांना दिला. जिला बोलण्याचा ही अधिकार नव्हता त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे तीला शासन निवडण्याचा अधिकार मिळाला पण अजूनही हा अधिकार मला या महामानवामुळे मिळाला ही गोष्ट अनेक महिलांना माहिती नाही. ती उपास तापास करण्यात एवढी गुरफटलेली आहे की सत्य जाणून घेत नाही.

असं म्हणतात की स्त्रीच्या वेदना केवळ स्त्रीलाच कळतात. पण स्त्रीच्या वेदना जाणणारा जगातील एकमेव पुरुष म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर होय. कारण स्त्रीला निसर्गाने मातृत्वाचं दान दिलं आहे. पण तिच्या कर्तृत्वात मातृत्व आड येऊ शकत हे बाबासाहेब यांनी ओळखले आणि म्हणून नौकरी करणाऱ्या महिलांना त्यांनी "प्रसुती रजेची " तरतुद केली. आणि अशी प्रसुती रजेची तरतूद करणारा भारत हा पाहिला देश आहे. आणि याचे सर्व श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जाते.धर्माने स्त्रीकडे केवळ उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले पण त्यांनी स्त्रीला मानवीदृष्टीने पाहिले आणि म्हणूच तीला पुरुषा इतकेच वेतन मिळावे यासाठी "समान वेतन "ची तरतूद केली. कलम 39(ड ) अन्वये हा तीचा मूलभूत हक्क बनवला. ज्या घरासाठी स्त्री आपलं आयुष्य समर्पित करते त्या घरात तिचं नाव ही नसतं पण पती, वडील यांच्या संपत्तीत स्त्रीला वाटा देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तीला " मालक " बनवलं. स्त्रीला ही मन आहे. आणि मन असलं म्हणजे या मनात ही "प्रेम पाखरू" भिरभीरल्या शिवाय राहणारं नसतं. हे पाखरू जाती धर्म पंथ प्रांत असा कोणताही भेदभाव न करता विहार करत. आणि न कळतं मानव जातीला ऐक्य आणि एकात्मता शिकवून जातं. या प्रेम आणि राष्टभावनेला कोणताही तडा जाऊ नये म्हणून आंतरजातीय विवाह करण्याचे स्वतंत्र्य स्त्रीला दिले. स्त्रीला मिळतं असलेला शिक्षणाचा अधिकार हा केवळ स्त्रियांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे मिळाला आहे. स्त्री शिक्षण घेऊन एखाद्या कार्यालयात गेली तर तिच्यासाठी "विशाखा समिती "स्थापल्या जाते. जेणे करुण कार्यालयच्या ठिकाणी ती सुरक्षित व निर्भीड पणे नौकरी करू शकेल. ही तरतूद घटनेमध्ये केल्यामुळे कार्यालय ठिकाणी महिलांचे लैगिक शोषण प्रतिबंध अधिनियम 2013 परित करण्यात आला. खरं तर स्त्रीला वाटते हे हक्क मला शासनाने दिले आहे. पण याचा जर आपण सखोल विचार केला तर आपल्याला लक्षात येईल याची तरतूद घटनेत डॉ आंबेडकर यांनीच केली आहे. एक महिला कधी मंदिराची पुजारी नाही होऊ शकत पण एक महिला सरपंच ते राष्ट्रपती पदापर्यंत जाऊ शकते ती केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे... जेव्हा डॉ आंबेडकर यांनी हिंदू कोड बील तब्ब्ल 5 वर्ष अभ्यास करुण तयार केले. हे हिंदू कोड बील सर्व जाती धर्माच्या स्त्रीला न्याय देणारं होतं पण त्याकाळतील सनातन्यांना एका स्त्रीने आपल्या पुढे जावे हे मान्य नव्हते. पण बाबासाहेब आंबेडकर तमाम स्त्रीयांसाठी संसदेत लढले. पण हे बील पास नाही होऊ शकले तेव्हा डॉ आंबेडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. स्त्रीला हक्क मिळू नये यासाठी तिच्या रस्त्यात काटे पेरणारे खूप आहेत पण तिच्या हक्कसाठी राजीनामा देणारा आतापर्यत एकमेव पुढारी होऊन गेले ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर... आणि जाता जाता एकच सांगेल -

खूप खूप उंच भरारी घे आकाशी 

पण विसरू नकोस भीमाला ज्याने घेतले तुला "हृदयाशी "....

✍️लेखिका : पी.आर.डंबाळे 

26 जानेवारी संविधान विचारमंच संचालिका

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या