🌟परभणीतील भिमा कोरेगाव मिञ मंडळ आयोजित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाची कार्यकारिणी जाहीर....!


🌟भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळा अध्यक्षपदी संदीप वायवळ यांची निवड🌟

परभणी :- परभणी येथील भिमा कोरेगाव मिञ मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले असून त्या अनुषंगाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्ष पदावर संदिप वायव्य यांची निवड करण्यात आली आहे.

परभणी शहरामध्ये भिमा कोरेगाव मित्र मंडळाकडून मोठा उत्साहात साजरी करण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाची दि.२८ मार्च २०२५ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसेवानिवृत्त तहसिलदार करामत खान, यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक भिमाकोरेगाव चौक येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी भिमाकोरेगाव मित्र मंडळ चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. परमपूज्य, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 व्या जयंती अध्यक्षपदी संदीप भैय्या वायवळ यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष ओम साळवे, अर्जून लोंढे, सचिव दिनेश गायकवाड, सहसचिव विकास टोंगराज, कोषाध्यक्ष सुनील लोणकर, सल्लागार वसीम मोमीन, समन्वयक प्रमोद अंभोरे, अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. 

"भिमाकोरेगाव चौक जयंती उत्सव समिती 2025" या बैठकीमध्ये नूतन अध्यक्ष संदीप भैया वायवळ यांनी बोलताना सांगितले की, जयंती हि सामाजिक उपक्रमांनी साजरी होणार असल्याचे यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या