🌟महाराष्ट्र राज्यातील देवस्थानांच्या इनामी जमिनी संदर्भात लवकरच कायदा आणणार....!

 


🌟त्यासंबंधी व्यापक निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने घेतला पुढाकार🌟

मुंबई :- महाराष्ट्र राज्यातील देवस्थान इनाम वर्ग ३ या जमिनी अहस्तांतरणीय असून त्यासंबंधी व्यापक निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे या जमिनींच्या व्यवस्थापनाबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी प्रधान सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत या निर्णयाची माहिती दिली असून, समितीच्या अहवालानंतर या संदर्भात नवीन कायदा करण्याचा विचार सरकार करत आहे विधानसभेत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली ज्यात त्यांनी देवस्थान जमिनींच्या हस्तांतराबाबत स्पष्ट धोरण आखण्याची मागणी केली. यावर महसूलमंत्री बावनकुळे यांनी उत्तर देताना सांगितले की, समितीत स्थानिक लोकप्रतिनिधी, महसूल विभागाचे अधिकारी आणि देवस्थान व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असेल. शासनाची भूमिका स्पष्ट असून, देवस्थानच्या जमिनी शेतकऱ्यांना मिळाव्यात, यासाठी सरकार सकारात्मक पावले उचलत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या