🌟महाराष्ट्र राज्य विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध : ६ पैकी १ अर्ज अवैध ; ५ जणांची बिनविरोध निवड....!

 


🌟भाजपचे दादाराव केचे,संजय केणेकर,संदीप जोशी,तर शिवसेना (शिंदे) चंद्रकांत रघुवंशी व  राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके बिनविरोध🌟

मुंबई :- महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत सहा पैकी एकाचा अर्ज अवैध ठरल्याने पाच जणांची बिनविरोध निवड झाली आहे विधानसभा निवडणुकीत विधान परिषदेचे पाच सदस्य विजयी झाल्याने विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या होत्या. यासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपच्या वाट्याला तीन तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रत्येकी एकाने उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

विरोधी पक्षांनी एकही उमेदवार उभा केला नव्हता परंतु एक अपक्ष अर्ज दाखल झाला होता. आज उमेदवारी अर्ज छाननी अपक्ष उमेदवाराच्या उमेदवारी अर्जावर एकाही आमदाराची स्वाक्षरी नसल्याने हा अर्ज बाद करण्यात आला. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत १० आमदारांच्या सूचक आणि १० आमदारांच्या अनुमोदक - म्हणून सह्या आवश्यक होत्या. त्यामुळे निवडणूक निर्णय - अधिकारी यांनी हा अर्ज अवैध ठरवला. २० मार्चपर्यंत अर्ज - मागे घेण्याचा कालावधी आहे. त्यानंतर निवडणूक अधिकारी - अधिकृत घोषणा करतील. यामध्ये भाजपचे उमेदवार दादाराव - केचे, संजय केणेकर, संदीप जोशी, तर शिवसेना शिंदे गटाकडून चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून संजय खोडके बिनविरोध निवडून आले आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या