🌟जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी माथूर यांनी तालुक्यात प्रथम आल्याबद्दल किरण न्यानोबा कदम हिचा केला सत्कार🌟
पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील कंठेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता ०८ वी वर्गातील विद्यार्थीनी कु.किरण न्यानोबा कदम हिने शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातुन प्रथम क्रमांक पटकावला तिच्या या यशाबद्दल परभणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर यांच्या वतीने आज शनिवार दि.२९ मार्च रोजी आयोजित सत्कार सोहळ्यात कु.किरण कदम हिचा सत्कार करण्यात आला.
कंठेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या कु.किरण कदम हिने आठवी शिष्यवृत्ती आठवी व एनएमएमएस आठवी या दोन्ही परीक्षेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला असून तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे......
0 टिप्पण्या