🌟हिवरखेडा येथील जल जिवन मिशन योजनेचे काम अद्यापही अर्धवटच : नागरिकांची पाण्यासाठी भटकंती🌟
✍️ शिवशंकर निरगुडे (हिंगोली)
हिंगोली : हर घर जल ही योजना भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने 2019 मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत सुरू केलेली योजना आहे ज्याचे उद्दिष्ट 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरडोई दरडोई 55 लिटर पाणी नियमितपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु केली आहे मात्र अद्यापही हिवरखेडा येथील जल जिवन काम पूर्ण झाले नाही त्यामुळे ग्रामस्थांना पायपिट करत पाणी आणावे लागत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील जल जिवनचे काम गेल्या दोन वर्षा पासून चालू आहे मात्र अद्यापही हे काम गुत्तेदाराने पूर्ण केले नाही त्यामुळे गावातील ग्रामस्थांना पायपिट करत शेतातील सरकारी विहिरीवरूनपाणी आणावे लागत आहे हिवरखेडा ग्रामपंचायच्या जलजीवन अंतर्गत खोदलेल्या विहिरीला भरपूर पाणी साठा उपलब्ध आहे आणि नळ जोडनी देखील टाकण्यात आली आहे पाण्याची टाकी देखील ऊभारण्यात आली आहे मात्र काही ठिकाणी पाईपलाईन टाकायची राहिली आहे त्यामुळे गावात पाणी सुटत नाही संबंधित गुत्तेदाराला वेळोवेळी सांगून देखील हे काम करण्यात येत नाही प्रशासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून जलजीवन मिशन चालू करण्यात आले मात्र याचे काम पूर्ण न झाल्यामुळे ग्रामस्थांचे हंडाभर पाण्यासाठी पायपीट करत पाणी आणावी लागत आहे
या आधी ग्रामपंचायत मार्फत गावातील विहीरीत पाणी सोडले जात होते मात्र गेल्या दोन दिवसा पासून पाणी सुटत नाही त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी वन वन फिरावे लागत आहे अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी सुटणे बंद झाले आहे ग्रामपंचायतच्या वतीने फुटलेली पाईपलाईन बरोबर करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे
💫नागरिकांच्या प्रतिक्रिया :-
आमच्या गावातील जलजीवन मिशनचे काम गेल्या दोन वर्षापासून चालू आहे अद्यापही काम अपूर्णच असल्यामुळे गावावर पाणीटंचाईची समस्या आहे. धरण उशाला आणि कोरड घश्याला असी परिस्थिती सद्या निर्माण झाल या पूर्वी देखील गावात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना शेतातील सरकारी विहिरीवरून डोक्यावर पाणी आणावे लागत होते आजही तीच परिस्थिती आहे. यामुळे जलजीवनचे काम गावात मंजूर झाले. यावर्षी तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल, असे वाटत होते. मात्र,जल जिवन मिशनचे हे काम अर्धवट झाल्याने पाण्याचा प्रश्न अद्यापही कायम आहे.
- शरद निरगुडे ग्रामपंचायत सदस्य राहणार हिवरखेडा तालुका सेनगाव
0 टिप्पण्या