🌟औरंगजेबाचा मुद्दा हा संयुक्तिक मुद्दा नाही : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही...!


🌟 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांची माहिती🌟

बंगळुरु - महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण क्रुरकर्मा औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलंच तापलेलं असताना व याच मुद्यावरुन नागपूरात दंगल पेटलेली असताना संघाने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. दरम्यान काल बुधवार दि.१९ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा बंगळूरूमध्ये होणार असून या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी वार्ताहरांनी त्यांना नागपूरची दंगल व औरंगजेबाच्या कबरीवरून उठलेल्या वादळावरून प्रश्न विचारले. त्यावर आंबेकर म्हणाले, औरंगजेबाचा मुद्दा हा सध्या संयुक्तिक नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही.

नागपूरमध्ये झालेल्या दंगलीच्या घटनेवर संघाची भूमिका काय आहे? असा प्रश्न पत्रकार परिषदेवेळी सुनील आंबेकर यांना विचारण्यात आला. त्यावर आंबेकर म्हणाले, संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करत नाही. त्यावर देशात अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना आता औरंगजेबाचा प्रश्न निर्माण करून आंदोलन करणे योग्य आहे का? असाही प्रश्न विचारण्यात आंबेकर यांना आला. त्यावर आंबेकर यांनी औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, असं उत्तर दिलं. संघाने या प्रकरणापसून स्वतःला दूर ठेवल्यानंतर मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी देखील यावर भाष्य केलं. ते म्हणाले, सुनील आंबेकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यावी इतका मी मोठा नाही. नागपुरात घडलेली घटना सुनीयोजित कटाचा भाग आहे आणि मी या भूमिकेवर ठाम आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या