🌟राज्यातील उपवधू उपवरां कडून श्री बालाजी मित्र मंडळ आयोजित मेळाव्याचे कौतुक🌟
हिंगोली (दि.०९ मार्च २०२५) - हिंगोली येथे इतिहासात प्रथमच आयोजित उपवधू उपवर परिचय मेळाव्याचा लाभ विवाह इच्छुकांना मिळवून देण्याचा बहुमान हिंगोलीच्या इतिहासात प्रथमच मिळवून देणाऱ्या श्री बालाजी मित्र मंडळ हिंगोलीचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे अश्या प्रतिक्रिया आर्य वैश्य समाज बांधव व भगिनिनीं दिल्या.येत्या २३ मार्च रोजी हिंगोली येथील अकोला बायपास शेजारील तिरुपती नगरातील तिरुमला लॉन येथे एक दिवसीय अंतरराज्य उपवर उपवधू परिचय मेळाव्याच आयोजन करण्यात आले आहे.
ह्या मेळाव्यासाठी साठी न मागता सर्वाधिक आर्थिक प्रथम योगदान पुणे येथील उद्योगपती अन् हिंगोलीचे भूमिपुत्र प्रशांत निलावार व सौ.सीमा निलावार,तसेच श्री बालाजी मित्र मंडळ विश्वस्त,विविध माध्यमातून दान देणारे दांनदाते,युवक युवती ज्येष्ठ नागरिक पत्रकार ह्यांचे पाठबळ लाभले. मेळाव्याच्या यशस्वीते साठी मराठवाडा विदर्भाचा श्री बालाजी मित्र मंडळाने समन्वय दौरा केला असता पुसद, उमरखेड, हदगाव, बाळापूर, वसमत, परभणी आदी ठिकाणी त्यांचं आर्य वैश्य समाजातील विविध संघटना,बांधव,भगिनींनी स्वागत केलं आणि शाबासकीची थाप देवून प्रोत्साहित केलं. देशातील आर्य वैश्य समाजाच्या वधूवर परिचय आणि सामूहिक विवाह मेळाव्याचे जनक पुसद येथील कै.श्रीराम आप्पाजी आसेगावकर ह्यांचे तैलचित्र कृषिभूषण दीपक आसेगावकर,ह्यांनी समाजाचे अध्यक्ष ॲड.उमाकांत पापिंनवार व अन्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मेळाव्यास साठी प्रदान केल . समाजसेवक बंधू भगिनी,विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी व सेवाभावी संघटना,ह्यांनी मेळाव्याच्या यशासाठी कुठलेही सेवा कार्य प्रत्यक्षात करू अशी ग्वाही देवून निश्चिंत रहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अस आश्वासन दिलं.विवाह जुळणे ही एक जटिल समस्या झाली असून सदरील मेळाव्यात अनेक विवाह जुळतील अन् ते मोफत करून देणार अशी ग्वाही विश्वस्त गिरीश गुंडेवार ह्यांनी मित्र मंडळाच्या वतीने दिली.२५० उपवधू आणि २५० उपवर ह्यांच्या परिचयाचे नियोजन असताना नोंदणीतील प्रतिसाद पाहता विवाह इछु़कानी तात्काळ ऑन लाईन नोंदणी करून संभाव्य निराशा टाळावी अस आवाहन आयोजकांनी केल नोंदणी साठी अधिक माहिती व्हॉटसअप माहिती पत्रके आदी द्वारे देण्यात आली असून क्यू आर कोड ही प्रसारित करण्यात आला व संपर्कासाठी भ्रमण ध्वनी देण्यात आल्याचे ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार ह्यांनी स्पष्ट केल. मेळाव्याचे उदघाटन पहिल्या क्रमांकाच्या नोंदणी केलेल्या उपवधू उपवराच्या हस्ते सकाळी ८.३० वाजता प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने केल्या जाणार, मेळाव्यात उपवधू उपवरांचे,गेट टुगेदर, स्नेहमिलन,प्रश्न मंजुषा उपक्रम होणार नाही,मध्यस्ती मंडळाच्या माध्यमातून उपवधू उपवर आणि पालकांच्या भेटीगाठी आणि थेट समन्वय घडवणार,मेळाव्यात हायटेक यंत्रणा असणार,खानपान व आवश्यक त्या साहित्यासह सर्व सुविधा सहभागी मंडळींना दिली जाणार,पूर्व सूचना देणाऱ्यास हिंगोली शहरातील गांधी चौकातील विक्रांत व साई लॉज आणि तिरुमला लॉन्स मधील काहि खोल्या फ्रेश होण्यासाठी दिल्या जाणार,ब्युटीपार्लर सुविधा सशुल्क दिल्या जाणार,दिवसभर चहा दूध कॉफी,शुद्ध पाणी जेवण खावन स्टेशनरी साहित्य सुविधा नोंदणी केलेल्याना निःशुल्क दिल्या जाणार आहेत.ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा अस आवाहन श्री बालाजी मित्र मंडळाचे विश्वस्त व हिंगोली आर्य वैश्य समाजातील सर्वांनी ने केलं आहे.....
0 टिप्पण्या