🌟महाराष्ट्र सरकार रुग्णालयांत जेनेरिक औषधांबाबत ठोस निर्णय घेणार का ?


🌟असा सवाल भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी उपस्थित केला🌟


मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रुग्णालयांत मेडिकल स्टोअर देऊन त्यात जेनेरिक औषध असावीत असा केंद्र सरकारचा निर्णय आहे त्या निर्णयाप्रमाणे राज्यसह मुंबईतील रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन ठोस निर्णय घेणार का ? असा सवाल भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी उपस्थित केला.

विधानपरिषदेच्या सदस्या उमा खापरे यांनी जेनेरिक औषधांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सहभाग घेत प्रवीण दरेकर म्हणाले की, जेनेरिक औषधे ठेवण्यासाठी बंधनकारक करता, परंतु आजही कुठल्याच प्रकारे सक्ती नाही. जेनेरिकला दुर्लक्षित केले जातेय. राज्यात रुग्णालयांना मेडिकल स्टोअर द्यावीत आणि त्यात जेनेरिक औषधेअसावीत अशा प्रकारचा केंद्र सरकारचा आग्रह आहे. त्याला मान्यताही मिळालीय. याबाबत महाराष्ट्रातील व मुंबईतील रुग्णालयांना निर्णय देणार का ? असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, याबाबत डॉक्टरांना सक्तीच्या सूचना केल्या जातील की त्यांनी औषधे देताना जेनेरिक किंवा ब्रँडेड असे लिहून द्यावे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या