🌟नगर परिषद प्रशासनात भ्रष्ट बेईमानशाहीचा उत्कर्ष ? डबल गुट्टेंचा उंटावरून शेळ्या हाकल्यागत भलताच तोरा🌟
पुर्णा (विशेष वृत्त) :- पुर्णेत पाण्याने भरगच्च भरलेला कोल्हापूरी बंधारा तरीही मागील पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी दरबदर भटकणाऱ्या माता-भगिनींसह नागरिकांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा ? अन् नगर परिषद प्रशासनात जणू भ्रष्ट बेईमानशाही कारभाराचा उत्कर्ष ? अन् मुख्याधिकारी व पाणीपुरवठा विभागातील डबल गुट्टेंचा उंटावरून शेळ्या हाकल्यागत भलताच तोरा अशी एकंदर दयनीय परिस्थिती सद्या संपूर्ण शहरात झाल्याचे पाहावयास मिळत असून शहरातील नागरिकांना मुलभूत नागरी सुविधा पुरविण्यात नगर परिषद प्रशासन संपूर्णतः निष्क्रिय ठरल्याचे पाहावयास मिळत असून मागील जवळपास चार वर्षांपासून 'प्रशासक राज' असतांना देखील नागरिक मुलभूत नागरी सुविधांना अक्षरशः तरसत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
पुर्णा-थुना नदीकाठावर बसलेल्या व पुर्णा नदीपात्रावर शासनाने सन १९९५ साली कोट्यवधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीतून कोल्हापूरी बंधारा बांधून दिल्यानंतर देखील पुर्णा शहरातील नागरिकांना एखाद्या वाळवंटात असल्यागत भर उन्हाळ्यात पाण्याअभावी पंधरा ते वीस दिवसांपर्यंत अक्षरशः तरसावे लागावे ही नगर परिषद मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे आणि पाणीपुरवठा विभागातील अभियंता किरण गुट्टे यांच्यासाठी निर्लज्जपणाचीच बाब म्हणावी लागेल पुर्णा शहरातील पाणीपुरवठा विभागांतर्गत असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पात पुर्णा नदीपात्रातील कोल्हापूरी बंधाऱ्यालगत असलेल्या जॅकवेलवरील पाणीसफ्लाई करण्यासाठी सन २००१ मध्ये पंचाहत्तर एचपीच्या दोन विद्यूत मोटारी होत्या एक विद्युत मोटार जळाली किंवा काही बिघाड झाल्यास शहराचा पाणीपुरवठा खंडित होऊ नये याकरिता दुसरी विद्युत मोटार तात्काळ कामात यावी हा या मागचा उद्देश त्यामुळेच अतिरिक्त विद्युत मोटार असणे आवश्यक असते परंतु नगर परिषद मुख्याधिकारी व पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांच्याकडून जॅकवेलवरील दोन्ही विद्युत मोटारी जळेपर्यंत दुर्लक्ष करण्याचा मुर्खपणा शहरातील नागरिकांसाठी घातक ठरल्याने मागील पंधरा वीस दिवसांपासून भर उन्हाळ्यात सनासुदीला संपूर्ण शहर पाण्यासाठी तळमळत असल्याचे व खाजगी पाणी विक्रेत्यांकडून पाणी विकत घेऊन आपल्या पाण्याच्या गरजा भागवत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
पुर्णा शहरात सन २००१ यावर्षी देखील अशाच प्रकारची तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती परंतु तत्कालीन मुख्याधिकारी व तत्कालीन पाणीपुरवठा सभापती शरद आप्पा कापसे यांनी पाणीटंचाईवर अत्यंत यशस्वीपणे मात करीत अर्धवट अवस्थेतील गेट न लावलेला बंधारा ताब्यात घेऊन पुर्णा नदीकाठावरील शेतांमध्ये फेकून देण्यात आलेली बंधाऱ्याची गेट एकत्रित करुन व ती बंधाऱ्याच्या लावून अर्धवट बंधारा उपयोगात आणण्याचं काम केल परंतु बंधाऱ्यात पाणीच उपलब्ध नसल्यामुळे आता काय करावे ? असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला होता यावेळी तत्कालीन आमदार ॲड.तुकाराम रेंगे पाटील यांना भेटून पाणीसाठा उपलब्ध करावा यासाठी परभणीला जात असतांना राहाटीचा बंधारा फुटल्याची घटना घडली होती त्यामुळे पुर्णेतील बंधाऱ्यात आपोआप पाणी उपलब्ध होऊन पाण्याचा गंभीर प्रश्न मार्गी लागला होता यावेळी देखील जॉकवेलवरील विद्युत मोटार जळाल्याची घटना घडली होती परंतु त्यांनी अवघ्या तीन तासांतच विद्युत मोटार दुरुस्त करून शहराचा पाणीपुरवठा सुरळीतच नव्हे तर शहरातील नागरिकांना सकाळ/संध्याकाळ असा दोन वेळा पाणीपुरवठा करण्याची किमया करून दाखवली होती सांगायचे तात्पर्य एवढेच की जनहीताशी बांधिलकी जोपासण्याची जिद्द इमानदारी मनी असल्यास असाध्य गोष्ट देखील साध्य करता येत असती अशी जिद्द अन् इमानदारी भ्रष्ट बेईमानशाहांमध्ये नसते एवढे मात्र निश्चितच
पुर्णा शहरातील नागरिक मागील पंधरा ते वीस दिवसांपासुन भर उन्हाळ्यात विशेष करून होळी/धुळमाती व पवित्र रमजान महिन्यात पाण्याअभावी तळमळत तडफडत असतांना निर्दयी मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे व पाणीपुरवठा विभागाचे अभियंता किरण गुट्टे यांना या भयंकर पाणीटंचाई सदृश परिस्थितीची यत्किंचितही जाणीव नसावी ही बाब निश्चितच निंदनीय म्हणावी लागेल शहरातील नागरिकांना आपल्या निष्क्रिय कारभारामुळे मुलभूत नागरी सुविधांपासून वंचित ठेवणे हा देखील एकप्रकारे गुन्हाच असून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी या कृत्रिम पाणीटंचाईची सखोल चौकशी करुन संबंधीत अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.......
💫पुर्णा शहरात बोगस विकास कामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निरर्थक खर्च ? पाणीपुरवठा विभागाकडे मात्र दुर्लक्ष :-
पुर्णा शहरातील विविध प्रभागांसह निर्मनुष्य वसाहतींमध्ये विकासकामांच्या नावावर कोट्यवधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीची सोईस्कररित्या विल्हेवाट लावून राज्य व केंद्र शासनाच्या विकासनिधींची उधळपट्टी मुख्याधिकारी नगर अभियंता व मर्जीतील बेईमान गुत्तेदारांनी संगणमताने केल्याचे दिसून येते परंतु याच शासकीय विकासनिधीतील थोड्याफार विकास निधीतून पाणीपुरवठा विभागातील नवीन विद्युत मोटारी खरेदी केला असता तर कदाचित आज शहरातील नागरिकांना भर उन्हाळ्यात ऐन सणासुदीच्या काळात पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ आली नसती ? परंतु संबंधित भ्रष्ट अधिकारी बेईमान गुत्तेदार व काही संधिसाधू आजी/माजी लोकप्रतिनिधींनी कोट्यवधी रुपयांच्या शासकीय विकासनिधी अक्षरशः धुळधाण केल्याने सर्वसामान्य नागरिकांची अक्षरशः बिन पाण्याची धुळमाती झाल्याचे पाहावयास मिळत आहे.....
0 टिप्पण्या