🌟डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षण विषयक विचार आचरणात आणला पाहिजे.....!


🌟पुर्णा तालुक्यातील सुरवाडी येथील धम्म परिषदेत बोलताना भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांचे प्रतिपादन🌟

पुर्णा : पुर्णा तालुक्यातील सुरवाडी या ठिकाणी दुसऱ्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन सुरवाडी येथील बौद्ध समाज बांधवांच्या वतीने दिनांक एक मार्च 2025 या दिवशी करण्यात आली होते धम्म परिषदेचे औचित्य साधून दहा दिवसीय श्रामनेर शिबिर व वंदनीय भिकू संघाची धम्मदेशना प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

धम्म परिषदेमध्ये प्रमुख मार्गदर्शनपर बोलत असताना अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी बुद्ध धम्म तत्व विचार प्रणाली न्याय नीती सदाचार व सर्व प्राणी मात्रा विषयी मंगल मैत्रीची भावना असणारी आहे. बुद्ध धम्माची शिकवण साधी सरळ सोपी व आचरणात आणण्यास योग्य अशा स्वरूपाची आहे यामधून संपूर्ण मानव जातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहे.विज्ञानावर आधारित असलेला हा धम्म बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले महान आदर्श आहेत त्यांनी आपणाला उच्च व दर्जेदार शिक्षण घेऊन त्याला शील चरित्र सदाचाराची जोड देऊन आपला स्वतःचा समाजाचा व देशाचा उद्धार करावा अशा प्रकारची शिकवण दिली आहे याप्रसंगी बोलताना ते म्हणाले मी दहावीला चार वेळा नापास झालो होतो. 

माझे गुरु भदंत उपाली थेरो यांनी मला उपदेश दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला शिक्षण घेण्याचा उपदेश दिला आहे चार वेळा नापास जरी झाला तरी परीक्षा देत जा अभ्यास करीत जा तो सल्ला मी अंगीकारला मी दहावी पास झालो नंतरच्या काळामध्ये मी कधीही नापास झालो नाही एम ए नेट सेट या परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये पास झालो पीएचडी सुद्धा प्राविण्य श्रेणी मध्ये पास झालो.माझ्या शिक्षणाचा विद्वत्तेचा उपयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे धम्म प्रचार आणि प्रसारासाठी मी करत आहे प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुला मुलींना शील चरित्र नीतिमत्ता सदाचाराचे धडे देऊन त्यांना उच्च व दर्जेदार शिक्षण द्यावे यामधून आपला उत्कर्ष साधावा यामध्येच आपले समाजाचे व देशाचे हित आहे अंधश्रद्धा बुवाबाजी व कर्मकांडापासून दूर राहून जुन्या रूढी परंपरा सोडल्या पाहिजे भदंत पयावंश यांनी उपस्थित भिकू संघाचा परिचय करून दिला परिषदेचे सूत्रसंचालन ज्येष्ठ धम्म उपासक गोपाळराव वाटोडे यांनी केले परिषद यशस्वी करण्यासाठी रमाई उद्योग समूहाचे अध्यक्ष व माजी सरपंच साहेबराव वाटोडे व सुरवाडी येतील बौद्ध पंच कमिटी यांनी केले. 

परिषदेला भारतीय बौद्ध महासभा पूर्णा तालुक्याचे माजी अध्यक्ष बौद्धाचार्य मुगाजी खंदारे,श्रीकांत हिवाळे बोधाचार्य त्र्यंबक कांबळे अतुल गवळी केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य गौतम दिपके बाजार समितीचे माजी संचालक गौतम दिपके सामाजिक कार्यकर्ते दीपक उर्फ बंटी रणवीर बालासाहेब रणवीर धनंजय रणवीर बौद्धाचार्य सोपान खरे राहुल दवणे व पूर्णा येथील रोहिणी धम्म सेवाभावी महिला मंडळ शिक्षक कॉलनी व सुजाता धम्म सेवा महिला मंडळ क्रांतीनगर आदींची उपस्थिती होती धम्म परिषदेसाठी आलेल्या सर्वांना भोजनदान संयोजन समितीच्या वतीने देण्यात आले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या