🌟राज्यसभेत मतदार ओळखपत्रांवरून विरोधकांचा सभात्याग....!

 


🌟तृणमूल आणि काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी राज्यसभेतून सभात्याग केला🌟


नवी दिल्ली : मतदारांना बनावट मतदान ओळखपत्रे वितरीत करताना झालेला गोंधळ आणि मतदारसंघ पुनर्रचना यावरील चर्चेची विरोधकांची मागणी फेटाळण्यात आल्याने काल सोमवार दि.१७ मार्च २०२५ रोजी तृणमूल आणि काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी राज्यसभेतून सभात्याग केला.

तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने मतदार ओळखपत्रांचा मुद्दा उपस्थित करण्याची इच्छा व्यक्त केली होती, तर तमिळी पक्षांना मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा उपस्थित करावयाचा होता. विरोधकांची ही मागणी अमान्य करण्यात आल्याने त्यांनी घोषणा देत सभात्याग केला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या