🌟पंतप्रधान मोदी यांना 'द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन' हा सर्वोच्च सन्मान🌟
पोर्ट लुईस : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सद्या मॉरिशस दौऱ्यावर असून त्यांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान 'द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन' हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय प्रधानमंत्री आहेत.
पंतप्रधान मोदींना कुठल्याही देशातर्फे देण्यात येणारा हा २१ वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असून यापुर्वीही त्यांना वीस देशांनी सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे या सन्मानानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मॉरिशसच्या लोकांनी, इथल्या सरकारने मला आपला सर्वोच्च नागरिक सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे. मी तुमच्या निर्णयाचा नम्रतेने स्वीकार करतो. हा भारत आणि मॉरिशसच्या ऐतिहासिक नात्याचा सन्मान आहे. हा त्या भारतीयांचा सन्मान आहे, ज्यांच्या पिढ्यांनी या भूमीची सेवा केली. या मातीमध्ये अनेक भारतीयांचा आपल्या वंशजांचा घाम मिसळलेला आहे. आपण सगळे एकच कुटुंब आहोत."
पोर्ट लुईस येथे झालेल्या भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच रामगुलाम यांनी या पुरस्काराची घोषणा केली. यानंतर मॉरिशसच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी रामगुलाम यांचे आभार मानले.....
0 टिप्पण्या